
गुहागर ः तालुक्यात होणार ताडगोळ्याची लागवड
rat29p3.jpg
32534
गुहागर ः गोल्डसन सॅम्युअल यानी ताडगोळ्याची लागवड करण्यासाठी १००० बिया तहसीलदार वराळे यांच्याकडे सुपुर्द केल्या. यावेळी सॅम्युअल यांचा सत्कार करण्यात आला.
..........
32567ः संग्रहीत
.............
गुहागर तालुक्यात होणार ताडगोळ्याची लागवड
तहसीलदार वराळे; सॅम्युअल यांच्याकडून बिया सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २९ ः तालुक्यात यावर्षी ३ हजार झाडे लावण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी एक हजार झाडे वनखात्याकडून तर पाचशे झाडे खेडमधून आणली आहेत. त्याचबरोबर ताडगोळे वृक्ष संवर्धनासाठी झटणाऱ्या गोल्डसन सॅम्युअल या व्यक्तीने १ हजार ताडगोळ्यांच्या बिया तहसीलदारांकडे आज सुपू्र्द केल्या.
गुहागरच्या तहसीलदार कार्यालयात आज ताडगोळे (पाल्मेरा पाल्म ट्री) लागवडीची माहिती देण्यासाठी छोटेखानी सभा घेण्यात आली. या सभेला ताडगोळे वृक्ष संवर्धन करणारे गोल्डसन सॅम्युअल उपस्थित होते. सॅम्युअल यांना तामिळनाडू सरकारने फादर ऑफ फार्म या पुरस्काराने गौरवले आहे. १ मेपासून २६ दिवस सात हजार किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यातून सॅम्युअल यांनी केला. या प्रवासात त्यांनी ताडगोळेच्या झाडांची लागवड आणि त्याचे उत्पादन पर्यावरणीय उपलब्धी या विषयी जनजागृती केली. भविष्यामध्ये भरपूर प्रमाणात ताडगोळेची झाडे लावण्यासाठी त्यांनी गुहागर तालुक्याची निवड केली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून ताडगोळ्यांच्या १ हजार बिया आज गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्याकडे सुपूर्द केल्या.
या कार्यक्रमाला जीवन श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे, शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत साळवी, अपरांत भूमी पर्यटन संस्थेचे विजय सावंत, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, कल्पतरू पर्यटन संस्थेचे अध्यक्ष नीलेश सुर्वे, महाराष्ट्र राज्य ज्युदो संघटना राज्य कार्यकारिणी सदस्य नीलेश गोयथळे आदी उपस्थित होते. या सर्वांना व्यक्तिगत लागवडीसाठी ताडगोळ्याच्या बिया सॅम्युअल यांनी भेट दिल्या.
--------------
चौकट
लागवडीचा आरंभ सुरूबनात करणार
पुढील दोन दिवसांत तालुक्यातील विविध ठिकाणी गुहागर तालुका प्रशासन, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ताडगोळ्याच्या बियांची लागवड करणार आहे. त्याचप्रमाणे अन्य शासनमान्य रोपांची लागवड केली जाणार आहे. वृक्षलागवडीचा आरंभ प्रांताधिकारी बुधवारी (ता. २९) सकाळी गुहागरच्या सुरूबनात करणार आहेत. तत्पूर्वी, गुहागर शहरामधून वृक्षलागवड जनजागृतीसाठी श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमधील मुलांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे, अशी माहिती गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72575 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..