चिपळूण ः विद्रुप झालेला चेहरा पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः विद्रुप झालेला चेहरा पूर्ववत
चिपळूण ः विद्रुप झालेला चेहरा पूर्ववत

चिपळूण ः विद्रुप झालेला चेहरा पूर्ववत

sakal_logo
By

rat२९p६.jpg
L32537
ः डॉ. शोएब खतीब
...........
सुखद काही......लोगो
........
अपघातात विद्रुप झालेला चेहरा शस्त्रक्रियेद्दारे पूर्ववत

चिपळुणमध्ये डॉ. शोएब खतिब यांनी केली पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया
चिपळूण, ता. २९ ः एका दुर्घटनेत चेहऱ्याला गंभीर दुखापत झालेल्या ३५ वर्षीय रुग्णाचा चेहरा ओळखू न येण्याइतका विद्रुप झाला होता. रुग्णाचे नाक व नाकाचे हाडं व चेहऱ्यावर १५ ते १६ ठिकाणी फ्रॅक्चर होती. सुरवातीला इमर्जन्सी ट्रॅकिओस्टोमी करून श्वसनक्रिया सुरळीत करण्यात आली व जीवावरील धोक्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने फेशियल रिकन्स्ट्रक्टिव्ह अँड प्लास्टिक सर्जरी (पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया) करून रुग्णाचा चेहरा यशस्वीरित्या पूर्ववत केला, अशी माहिती डॉ. शोएब खतीब यांनी दिली. ही शस्त्रक्रिया लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये करण्यात आली.
लाईफ केअर हॉस्पिटलचे ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ. शोएब खतिब यांनी माहिती दिली.ते म्हणाले की, या रुग्णाला अत्यंत नाजूक स्थितीत रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. रमेश शिंदे (नाव बदललेलं) हे चिपळूणमध्ये राहणारे आहेत. दररोजप्रमाणे काम करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठा दगड कोसळला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. साधारणतः १५ ते १६ ठिकाणी चेहऱ्यावर फ्रॅक्चर होते. नाकाचे हाडं पूर्णतः तुटले होते. उजवा डोळ्याला दुखापत झाली होती. अशा स्थितीत रुग्णाला लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कुटुंबीयांच्या परवानगीने या रुग्णावर डॉ. शोएब खतिब यांनी चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करून चेहरा पूर्ववत केला. आता रुग्णाची प्रकृती उत्तम असून, त्याला जगण्याची एक नवीन उमेद मिळाली आहे.
...
चौकट
जन आरोग्यमधून विनामूल्य उपचार
या शस्त्रक्रियेद्वारे उच्च दर्जाच्या १५ प्लेट्स आणि स्क्रूचा वापर करून चेहऱ्यावरील फ्रॅक्चर्स दुरुस्त करण्यात आले. साधारणतः पाच तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा विद्रुप झालेला चेहरा पूर्ववत झाला आहे. ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली आहे.
....
चौकट
रुग्ण व नातेवाइकांनी मानले आभार
तरूणाच्या उजव्या बाजूच्या डोळ्याला जबर मार बसल्याने त्याचा डोळ्याला दुखापत झाली आहे. या रुग्णाची दृष्टी परत यावी, यासाठीही डॉक्टर प्रयत्न करत आहेत. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण व नातेवाइकांनी डॉ. शोएब खतिब यांचे मनापासून आभार मानले.
-----------------------------
चौकट
हाडांची चांगली पुनरर्चना
पूर्वी हाता-पायाला फ्रॅक्चर झाल्यास प्लास्टर घातले जात होते. अनेक महिने प्लास्टरमध्ये रुग्णाला जखडून टाकले जात होते; पण आता तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. फ्रॅक्चर बरं करण्यासाठी आता अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. यात चेहऱ्याची पुनर्रचना ही एक शस्त्रक्रिया आहे. चेहऱ्याला दुखापत झाल्यास प्लेट्सचा वापर करून हाडांची चांगली पुनरर्चना केली जाते. त्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यावरील हाडे लवकर जुळून येतात.
-------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72578 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top