कणकवलीतील पालकमंत्र्यांचे बॅनर हटवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीतील पालकमंत्र्यांचे बॅनर हटवले
कणकवलीतील पालकमंत्र्यांचे बॅनर हटवले

कणकवलीतील पालकमंत्र्यांचे बॅनर हटवले

sakal_logo
By

swt296.jpg
32574
कणकवली : येथील श्रीधर नाईक उद्यानाला निधी दिल्याबद्दल पालकमंत्र्याच्या आभाराचे बॅनर शिवसैनिकांनी काढून टाकले.

कणकवलीतील पालकमंत्र्यांचे बॅनर हटवले
शिवसैनिकांमध्ये रोषः शिंदे गटात सामील झाल्‍याने पाऊल
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २९ : सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या स्वागताचे, उद्यानाला निधी दिल्याबद्दल आभाराचे बॅनर शिवसैनिकांनी काढून टाकले आहेत. सामंत हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात सामील झाल्‍याने शिवसैनिकांत रोष आहे. त्‍यामुळेच हे बॅनर हटविल्‍याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
सावंतवाडीतील शिवसेनेच्या मेळाव्याला येणार, अशी ग्‍वाही देणारे पालकमंत्री सामंत अचानक गुवाहाटी येथे रवाना झाले. त्‍यांनतर ते शिंदे गटात सामील झाले. यापूर्वी आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटात सामील झाल्‍याने शिवसैनिकांनी केसरकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्‍यानंतर पालकमंत्री सामंत यांच्या विरोधातही शिवसैनिक आक्रमक झाले असून शहरातील श्रीधर नाईक उद्यान तसेच अन्य भागात पालकमंत्र्यांचे फोटो असलेले सर्व बॅनर काढून टाकण्यात आले आहेत.
कणकवली शहरातील श्रीधर नाईक उद्यान महामार्ग चौपदरीकरणात बाधित झाले होते. या उद्यानाच्या डागडुजीसाठी पालकमंत्री सामंत यांनी जिल्‍हा नियोजनमधून ७५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्‍यामुळे त्‍यांच्याच हस्ते २२ जूनला या उद्यानाचे उद्‌घाटन होणार होते. मात्र, राज्‍यात राजकीय स्थित्यंतराच्या घडामोडी सुरू झाल्‍याने सामंत हे कणकवली ऐवजी मुंबईला रवाना झाले होते.
कणकवली शहरात श्रीधर नाईक उद्यानाबाहेर पालकमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. याखेरीज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, श्रीधर नाईक तिठा, पटवर्धन चौक आदी ठिकाणी पालकमंत्र्यांचे बॅनर लावण्यात आले होते. ते सर्व शिवसैनिकांनी गेल्‍या दोन दिवसांत काढून टाकले आहेत.

चौकट
सामंत समर्थक ग्रुपमधून बाहेर
पालकमंत्री उदय सामंत हे गुवाहाटी येथे जाऊन शिंदे गटात सामील झाले. त्‍यानंतर त्‍यांचे समर्थक असलेले काही शिवसैनिक शिवसेनेच्या व्हॉट्सअॅप ग्रूप मधून बाहेर पडले आहेत. हे कार्यकर्ते सध्या सक्रिय राजकारणापासूनही बाहेर आहेत. राज्‍यात सत्तांतर झाले तर सामंत यांचे समर्थक पुन्हा सक्रिय होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72604 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..