चिपळूण ः कृत्रिम अवयव वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः कृत्रिम अवयव वाटप
चिपळूण ः कृत्रिम अवयव वाटप

चिपळूण ः कृत्रिम अवयव वाटप

sakal_logo
By

फोटो काल सोडला
...
rat२९p४.jpg
३२५३५
ः चिपळूण ः कृत्रिम अवयव रोपण शिबिरात दिव्यांग बंधूंसमवेत रोटरीचे पदाधिकारी.
......
कृत्रिम अवयवांचे १०० हून
अधिक दिव्यांगांना वाटप

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः रोटरी क्लब ऑफ चिपळूण, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघात मोफत कृत्रिम हात व पाय शिबिर मागील महिन्यात घेण्यात आले होते. या शिबिरात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, विरार, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील सुमारे १००हून अधिक दिव्यांगांना आवश्यक असलेले कृत्रिम अवयव देण्यात आले. हजारो रुपये किमतीचे साहित्य मोफत मिळाल्याने दिव्यांगाना मोठा दिलासा मिळाला.
या शिबिरासाठी दिव्यांग बांधवांनी सकाळपासून हजेरी लावली होती. आलेल्या बांधवांचे रोटरी क्लब सदस्याकडून चांगली काळजी घेतली जात होती. शिबिरात एकाने पोहोचताच चहा-नाश्ता तसेच दिव्यांग बांधवांचे कोणतीही हेळसांड होणार नाही, याची पुरेपूर दक्षता रोटेरियनकडून घेतली जात होती. या वेळी हजारो रुपये किमतीचे साहित्य मोफत वाटप केले. काही नागरिकांना जन्मताच अपंगत्व आलेले असते तर काहींना अपघाती अपंगत्वाला सामोरे जावे लागते. अपंगत्वावर मात करून त्यांनी इतरांप्रमाणेच विविध ठिकाणी वावर करावा, त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, या हेतूने या कृत्रिम अवयव रोपण शिबिर घेतले होते. सुरवातीला त्यांना आवश्यक असलेल्या कृत्रिम हातापायाची मापे घेण्यात आली. या शिवाय ज्या दिव्यांग बांधवांना कॅलिपर कुबड्या व्हीलचेअर, काठी, कुबड्या, स्टिक याची आवश्यकता आहे त्यांनाही ती उपलब्ध करून दिली. सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सांगली, कोल्हापूर येथून दिव्यांग बांधव शिबिरासाठी दाखल झाले होते. शिबिरासाठी रोटरीचे अध्यक्ष प्रसाद सागवेकर व त्यांच्या टीमने मेहनत घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72645 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top