रत्नागिरी ः ...त्या टोळीच्या मागावर पोलिसांची पथके रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः ...त्या टोळीच्या मागावर पोलिसांची पथके रवाना
रत्नागिरी ः ...त्या टोळीच्या मागावर पोलिसांची पथके रवाना

रत्नागिरी ः ...त्या टोळीच्या मागावर पोलिसांची पथके रवाना

sakal_logo
By

रिक्षाचालकांची लूट; टोळीच्या मागावर पथके

गुंगीचे औषध देऊन केले होते बेशुद्ध; संशयित मोकाट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : रत्नागिरीतील दोन रिक्षाचालकांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्‍या टोळीचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. १५ दिवस उलटूनही शहर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलेले नाही. सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद झाले होते़. पोलिसांची पथके जिल्ह्याबाहेर या टोळीच्या मागावर रवाना केली आहेत.
ही धक्कादायक घटना ११ जूनला घडली होती. गणपतीपुळे येथे जायचे असल्याचे शहरातील दोघा रिक्षाचालकांना या टोळीकडून सांगण्यात आले. आशिष संजय किडये (वय २९, रा. धनजीनाका रत्नागिरी) आणि विनेश मधुकर चौगुले (वय ४५, रा. कसोप, रत्नागिरी) अशी दोघा रिक्षाचालकांची नावे आहेत. त्यानुसार प्रथम आशिष याने तिघा पर्यटकांना गणपतीपुळे या ठिकाणी नेले. दरम्यान, संबंधित पर्यटक हे रत्नागिरीच्या दिशेने परत येत असताना त्यांनी आशिष याला प्रसाद म्हणून खाण्यास लाडू दिला होता. लाडू खाल्ल्यानंतर आशिष हा बेशुद्ध पडला. यानंतर पर्यटक बनून आलेल्या तिघांनी त्याच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल, एटीएम कार्ड, एक तोळ्याची सोन्याची साखळी लुटून नेले. दरम्यान, आशिष हा दुपारी घरी परत आला नसल्याने त्याच्या वडिलांनी शोधाशोध सुरू केली. यानंतर तो दुपारी दोनच्या सुमारास परटवणे साईमंदिर ठिकाणी बेशुद्धावस्थेत दिसून आला. त्याला तातडीने उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
दुसऱ्‍या घटनेत, रिक्षाचालक विनेश मधुकर चौगुले यांना दुपारी गणपतीपुळेसाठी भाडे मिळाले. तसे त्यांनी आपल्या मित्राला आपण गणपतीपुळे या ठिकाणी भाडे घेऊन जात असल्याचे सांगितले होते. दरम्यान, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विनेश हा चंपक मैदान या ठिकाणी बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याच्याकडील देखील सोन्याची साखळी, पाकीट, रिक्षाची चावी आदी लुटून नेल्याचे समोर आले होते. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------------------------
चौकट
टोळी सराईत असल्याचा अंदाज
गुंगीचे औषध देऊन अशाप्रकारे चोरी करणारी ही टोळी सराईत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे़. लवकरच संशयितांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथकं वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72663 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..