२ सं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२ सं
२ सं

२ सं

sakal_logo
By

रोटरी स्कूलमध्ये जागतिक
अंमली पदार्थ सेवनविरोधी दिन
खेड ः रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा केला. शाळेच्या विज्ञान विभागप्रमुख मीरा पवार यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन न करण्याची शपथ दिली. आजचा युवक हेच देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. आपल्या देशाची तरुणपिढी नशेच्या जाळ्यात अडकून आपले आयुष्य खराब करत आहे. अंमली पदार्थांचे सेवन केल्यास ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याकारणाने याविषयी समाजात जागृकता निर्माण करण्यासाठी तसेच तरुण पिढीला वाचवण्यासाठी दरवर्षी २६ जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच या दिवशी जगभरातील व्यक्ती समुदाय आणि विविध संस्थांद्वारे या समस्येबद्दल जागरुकता निर्माण केली जाते.
---
विधवा प्रथा बंद करण्याबाबत निवेदन
देवरूख ः कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतीना आदेश दिले आहेत की, विधवा प्रथा बंद करण्यात याव्यात, याची दखल घेऊन कोकणातील नाणीज, दापोली या ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्या आहेत. याचा बोध घेऊन मौजे तळेकांटे गावातील विधवा प्रथा तळेकांटे ग्रामपंचायतीने बंद करावी, यासाठी सरपंच सुरेश तुकाराम गुरव यांना ग्रामपंचायत सदस्य आयु अमोल कांबळे यांच्याकडून विनंतीवजा निवेदन देण्यात आले आहे. कोकणात प्रामुख्याने पतीचे निधन झाल्यानंतर त्या महिलेचे कुंकू पुसले जाते, हिरवा चुडा फोडला जातो, सौभाग्याचे सगळेच अलंकार सामाजिक दृष्टिकोनातून हिसकावून घेतले जातात. या सामाजिक प्रथा बंद करणे कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहे. सामाजिक दृष्टिकोनातून विधवा स्त्रियांना कोणत्याही मंगल कार्यक्रमात बोलवले जात नाही, त्यांचा उचित मानसन्मान केला जात नाही. भारतीय समाजातील कोणत्याही महिलेला कायद्यानुसार योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे आणि याची सुरवात गावखेड्यातून झाली पाहिजे, असेही निवेदनात म्हटले.
---------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72674 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..