
सावंतवाडी पालिकेतर्फे प्रशिक्षणाचे आयोजन
सावंतवाडी पालिकेतर्फे प्रशिक्षणाचे आयोजन
सावंतवाडीः पालिकेमार्फत शहरातील १८ ते ४५ वयोगटातील मुली व महिलांसाठी शिवणक्लास, कॅटरिंग, टॅली, एमएससीआयटीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिवणक्लास ४० दिवस, कॅटरिंगचे प्रशिक्षण ३० दिवस तर टॅलीचे प्रशिक्षण ६० दिवसांचे तज्ज्ञ प्रशिक्षण नोंदणीकृत संस्थांकडून देण्यात येणार आहे. ज्यांना हे तिन्ही प्रशिक्षण घ्यायचे असेल त्या मुली व महिलांनी ३० जूनपर्यंत नगरपरिषद कार्यालयातील महिला व बालकल्याण विभागातील लिपिक गीता जाधव यांच्याकडे संपर्क साधावा. त्यांच्याकडे अर्ज उपलब्ध आहेत. प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केले आहे.
---------------------
माजगावात माड कोसळला
सावंतवाडीः माजगाव दत्तमंदिरजवळ अचानक माड रस्त्यावर कोसळला. सुदैवाने दुचाकीस्वार बालबाल बचावला; मात्र या मार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प राहिली. हा प्रकार मंगळवारी (ता. २८) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला. सावंतवाडी - मळगाव मार्गावरील माजगाव येथील दत्तमंदिर परिसरातील माड अचानक रस्त्यावर कोसळला. यावेळी या मार्गावरून सावंतवाडीकडे जाणार्या दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत दुचाकी थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली.
---------------------
झाड पडल्याने सांगेलीत वाहतूक ठप्प
ओटवणेः सांगेली-जायपीवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रानजिक भर रस्त्यावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळताच सुपरवायझर शैलेश राणे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सांगेलीतील सामाजिक कार्यकर्ते लवू भिंगारे आणि वामन नार्वेकर, संजय कविटकर, संजय राऊळ, नीलेश नार्वेकर, ऋषिकेश जाधव व इतर वाहन चालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कटरच्या सहाय्याने ते झाड रस्त्यावरून हटविले.
----------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72719 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..