भंडारी समाज गुणवंतांचा १० जुलैला मालवणात गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंडारी समाज गुणवंतांचा १० जुलैला मालवणात गौरव
भंडारी समाज गुणवंतांचा १० जुलैला मालवणात गौरव

भंडारी समाज गुणवंतांचा १० जुलैला मालवणात गौरव

sakal_logo
By

भंडारी समाज गुणवंतांचा १० जुलैला मालवणात गौरव
मालवण, ता. २९ : तालुका भंडारी संघाच्या वतीने दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा १० जुलैला सकाळी १०.३० वाजता भरड येथील लीलांजली हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. यात भंडारी समाजातील ज्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के गुण मिळाले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतिसह पंकज पेडणेकर, राजेंद्र आंबेरकर, सुनील नाईक (कट्टा), भाऊ नार्वेकर (काळसे), बाबू परुळेकर (आचरा) यांच्याकडे ४ जुलैपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. मालवण तालुका भंडारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष रवी तळाशीलकर, प्रदीप वेंगुर्लेकर, मोहन वराडकर, राजेंद्र आंबेरकर, भाऊ हडकर, सागर हडकर, यजुवेंद्र हडकर, पंकज पेडणेकर आदी उपस्थित होते.
------------
''निराधार''च्या ९५
प्रकरणांना मालवणात मंजुरी
मालवण, ता. २९ : तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक समितीचे तालुका अध्यक्ष मंदार केणी व तहसीलदार अजय पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय येथे झाली. या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ९५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
लाभार्थ्यांचे मागील काही महिन्यांचे अनुदान रखडले होते. यापैकी अनुसूचित व जनरल विभाग अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे. ते लाभार्थ्यांकडे जमा केले जाईल. अन्य अनुदानही लवकर मिळेल. अशी माहिती मंदार केणी यांनी दिली. यावेळी समिती सदस्य सुनील पाताडे, गणेश कुडाळकर, भाऊ चव्हाण, प्रमोद कांडरकर, महेंद्र मांजरेकर, अनुष्का गावकर आदी उपस्थित होते.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72721 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..