जिमखाना-जाधववाडीतील घरांना धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिमखाना-जाधववाडीतील घरांना धोका
जिमखाना-जाधववाडीतील घरांना धोका

जिमखाना-जाधववाडीतील घरांना धोका

sakal_logo
By

swt२९२२.jpg
३२६६३
सावंतवाडी : जिमखाना-जाधववाडी ग्रामस्थांशी चर्चा करताना बबन साळगावकर, सोबत प्रशांत पानवेकर, जयंत जावडेकर, बबन भोगटे आदी. (छायाचित्रः रुपेश हिराप)

जिमखाना-जाधववाडीतील घरांना धोका
घळण कोसळण्याच्या स्थितीतः तात्काळ उपाययोजना करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः शहरातील जिमखाना-जाधववाडी येथील कोसळत असलेली घळण, त्यामुळे तेथील घरांना असलेला धोका लक्षात घेता या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करा, असे आदेश प्रांताधिकारी तथा नगरपालिका प्रशासन प्रशांत पानवेकर यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना आज दिले.
जिमखाना मैदान येथे लागून असलेल्या जाधववाडीचा काही भाग घळणीवर (उंचवढ्यावर) आहे. याठिकाणी सोळा घरे आहेत; मात्र या घळणीला लागून पालिका प्रशासनाने नाल्याच्या स्लॅबचे काम हाती घेतले आहे. यासाठी घळणीला काही भाग खोदला आहे. हा भाग पाडण्यासाठी तेथील नागरिकांनी पालिका प्रशासनाला विरोध केला होता; मात्र तरीसुद्धा प्रशासनाने विरोध जुमानत काम केले. परिणामी सुरू झालेल्या पावसाळ्यात घळणीची माती कोसळत असून तेथील घरांना धोका निर्माण झाला आहे.
याबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रांताधिकारी पानवेकर यांचे लक्ष वेधून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज सायंकाळी श्री. पानवेलकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, बांधकामचे शिवप्रसाद कुडपकर यांच्यासह प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. यावेळी तेथील ग्रामस्थांनी आपला रोष अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला व भविष्यातील धोका समजावून सांगितला. झालेल्या प्रकार हा चुकीचा असून अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्यास वेळ नसल्याने हा धोका उद्भवला आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी केला. शिवाय नागरिकांच्या जीवितास धोका उद्भवल्यास याला सर्वस्वी पालिका प्रशासनच जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी जावडेकर यांना आदेश देताच आवश्यक ते उपाययोजना राबवण्याचे मान्य केले. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, संजय पेडणेकर, रवी जाधव उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72744 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..