कणकवली : नियंत्रण कक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : नियंत्रण कक्ष
कणकवली : नियंत्रण कक्ष

कणकवली : नियंत्रण कक्ष

sakal_logo
By

विज आपतकालीन स्थितीत
नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा
महावितरणचे आवाहन
कणकवली,ता. ३० : पावसाळ्याच्या दिवसात वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून पडणे, रोहित्र कोसळणे अशा घटना घडतात. तेव्हा नागरिकांनी वीज यंत्रणेला स्पर्श करणे टाळावे. अशा स्थितीत वीजग्राहकांनी वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. धोकादायक वीजयंत्रणेची सुचना तत्काळ महावितरणच्या कार्यालयास द्यावी. आपातकालीन स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे महावितरणचे आवाहन आहे.
जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ७८७५७६५०१९ असा आहेत. नागरिक व वीजग्राहक आपातकालीन स्थितीत या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देऊ शकतात. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन विभाग,उपविभाग स्तरावर समन्वयासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत. निसर्ग, तौक्ते या चक्री वादळांचा तडाखा, कोरोनाचा संकटकाळ अशा आपत्तीप्रंसगी केलेल्या कामाचा अनुभव महावितरण कर्मचाऱ्यांच्या गाठीशी आहे. संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी महावितरणने आवश्यक पुर्वतयारी केली आहे. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे १०१२ किंवा १८००-१०२-३४३५ या क्रमांकावकर २४ तास सेवेत असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72838 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top