ओटव-नांदगाव प्रशालेतर्फे ‘बांधावरची शाळा’ उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओटव-नांदगाव प्रशालेतर्फे ‘बांधावरची शाळा’ उपक्रम
ओटव-नांदगाव प्रशालेतर्फे ‘बांधावरची शाळा’ उपक्रम

ओटव-नांदगाव प्रशालेतर्फे ‘बांधावरची शाळा’ उपक्रम

sakal_logo
By

32722
नांदगाव ः ‘बांधावरची शाळा’ उपक्रमात सहभागी ओटव प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक. (छायाचित्र ः निकेत पावसकर)

ओटव-नांदगाव प्रशालेतर्फे
‘बांधावरची शाळा’ उपक्रम
तळेरे, ता. ३० ः ओटव-नांदगाव (ता.कणकवली) प्रशालेने ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम राबविला. दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने हा उपक्रम घेतला नव्हता. मुलांना जिल्ह्यातील पारंपरिक शेतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी हा उपक्रम राबविला जातो.
जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा बांधावरील शाळा हा उपक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे बंद होता. कोरोनाचा वेग मंदावल्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. पुस्तकाचे धडे घेताना विद्यार्थ्यांना शेतीचेही धडे देणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद शाळा ओटव-नांदगाव व शाळा व्यवस्थापन अध्यक्षा, सर्व सदस्य यांच्या समवेत बांधावरची शाळा हा उपक्रम घेतला. भारत हा देश शेतीप्रधान आहे. येथील ९० टक्के लोक शेतीवर उपजिविका करतात. साहजीकच बालवयात शेतीची आवड निर्माण झाली, तर निश्चितपणे आजचे विद्यार्थी शेतीचे धडे गिरवून आधुनिक शेतीकडे वळतील, असा विश्वास शाळा व्यवस्थापन अध्यक्षा दीप्ती परब यांनी व्यक्त केला. यावेळी विद्यार्थी व मुख्याध्यापक आनंद तांबे, शिक्षिका रुपाली हुन्नरे तसेच पालक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72862 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top