
अमली पदार्थ विरोधानिमित्त मालवणात जनजागृती
L32726
मालवण ः येथील पोलिसांच्यावतीने शहरात अंमली पदार्थ दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली.
अमली पदार्थ विरोधानिमित्त
मालवणात जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला येथील पोलिसांच्या वतीने शहरात रॅली काढून व बॅनर लावून अंमली पदार्थ दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली.
शहरी भागात तरुण मुले, विद्यार्थी, युवक हे ड्रग्ज व्यसनाच्या आहारी जात आहेत असे चित्र आहेत. ड्रग्ज सेवनामुळे त्यांचे आयुष्य उदध्वस्त होत आहे. अंमलीपदार्थ विरोधात जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होते. एक पल का नशा..जीवनभर करी सजा... मादक द्रव्याची गोळी... करी जीवनाची होळी... असे सांगत जनजागृती केली जात आहे. येथील पोलिसांच्यावतीने पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब तसेच पोलीस कर्मचारी कैलास ढोले व कर्मचाऱ्यांनी आज सायंकाळी शहरात जनजागृती केली. तसेच २६ व २७ जून रोजी गाव व शहर स्तरावर बॅनर लावून. छोट्या सभा घेऊन तसेच कॉलेज, महाविद्यालय व बाजारपेठा याठिकाणी जनजागृती करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72867 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..