
टु १
rat29p13.jpg
32728
चिपळूण ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीयोजनेचे पाइप फुटल्याने महामार्गावर तळे साचले आहे.
......
पालिकेच्या नळपाणी योजनेला गळती
चिपळुणात महामार्गावर तळे; गढूळ पाणी थेट नागरिकांच्या घरात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ ः शहरातील जीबी मेहता पेट्रोलपंपसमोर पालिकेच्या नळपाणी योजनेची पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पाण्याचे तळे साचले आहे. चार दिवसांपूर्वी फुटलेल्या नळपाणी योजनेची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्याशिवाय गढूळ पाण्याची समस्या आहे.
चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पालिकेची नळपाणी योजना आहे. उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कामगारांकडून पालिकेची पाणीयोजनेची पाइपलाइन अनावधानाने फुटली. चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला; मात्र अद्याप त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे या परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत दुचाकी आणि मोठ्या वाहनांना ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावर साचलेले गढूळ पाणी जलवाहिनीतून नागरिकांच्या घरांत जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याचा धोका असतानाच पुन्हा या प्रकारामुळे आणखी आजार बळावण्याची शक्यता आहे. खेर्डी जॅकवेल येथून ही जलवाहिनी येते. या जलवाहिनीतून निम्म्या शहराला पाणीपुरवठा होतो. बहादूरशेख नाका सोडल्यानंतर पुढे काही अंतरावर ही जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे येथील गढूळ पाणी शहरातील निम्म्या भागाला पोहोचण्याची शक्यता आहे तसेच पाइपलाइनला गळती लागल्यामुळे शहरातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
..............
कोट
पालिकेची पाइपलाइन फुटल्याने चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीमार्फत याची कल्पना नगरपालिकेला देणे गरजेचे आहे. पाइपलाइन फुटल्यानंतर त्याची तत्काळ दुरुस्ती व्हायला पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी सूचना आम्ही पाणी विभागातील कर्मचाऱ्यांना केली आहे.
- शशिकांत मोदी, माजी नगरसेवक चिपळूण
.........
कोट
चार दिवसांपूर्वी पाइपलाइन फुटली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तत्काळ दुरुस्त केली. पुन्हा पाइपलाइन फुटल्याचे कोणी सांगितले नाही. तरीही कर्मचारी पाठवून ती दुरुस्त करून घेतली जाईल.
- अविनाश पेठे, पाणीपुरवठा विभाग चिपळूण पालिका
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72877 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..