देवगड किनारपट्टीला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड किनारपट्टीला पावसाने झोडपले
देवगड किनारपट्टीला पावसाने झोडपले

देवगड किनारपट्टीला पावसाने झोडपले

sakal_logo
By

देवगड किनारपट्टीला पावसाने झोडपले
रस्ते पाण्याखाली ः काही ठिकाणी वाहतुक विस्कळीत
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः तालुक्याच्या किनारपट्टी भागाला आज पावसाने चांगलेच झोडपले. जोराच्या पावसाने ठिकठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. देवगड नांदगाव रस्त्यावर जामसंडे पेट्रोलपंपाजवळ रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. शाळांच्या मुलांनाही पाण्यातूनच वाट काढीत घर गाठावे लागले.
मंगळवारी (ता.२८) रात्रीपासून पावसाने जोर धरला होता. आज दुपारच्या सुमारास दमदार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे सर्वत्र पाणी-पाणी झाले. जामसंडे पेट्रोल पंपाजवळ रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. पाण्यात शहरातून जाणारा देवगड नांदगाव रस्ता हरवला होता. रस्त्यावरून वाहणार्‍या पाण्यातूनच वाहनांची ये-जा सुरू होती. शाळा सुटण्याच्या वेळेसच जोराचा पाऊस झाला. अशावेळी पाण्यातूनच विद्यार्थ्यांना जावे लागत होते. पावसाळी पाण्यातून जाताना काही दुचाकी बंद पडल्याने वाहन चालकांना त्रास सोसावा लागला. छोट्या वाहनानाही पावसाच्या पाण्याचा त्रास जाणवला. जामसंडे भागातील विविध नगरातील रस्तेही पाण्याखाली गेले होते. रस्त्यावरून वाहणार्‍या पाण्यातूनच नागरिक, शाळकरी मुले तसेच वाहनचालक वाट काढीत जात होते. सततच्या झालेल्या दमदार पावसाने रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नियोजन तोकडे पडल्याचे दिसत होते. या भागातील मुख्य रस्त्याकडेला काही नव्याने बांधकामे सुरू आहेत. बहुदा त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून रस्त्यावर पाणी येत असावे, असा अंदाजही वर्तवण्यात येत होता. या भागात सातत्याने पाणी रस्त्यावर येत असल्याने काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता बनली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासनाने याची संयुक्त पहाणी करून ठोस उपाययोजना करण्याबाबत विचारविनिमय करण्याची आवश्यकता असल्याचे मत वाहनचालकांमधून व्यक्त होत होते. सतत जोराचा पाऊस कोसळत राहिल्यास देवगडला जाणारा मार्ग बंद होऊ शकतो असेही चित्र होते. रस्त्याकडेला सक्षम गटारे नसल्याने पाणी रस्त्यावर येत असल्याचे दिसून येत होते. पावसाच्या पाण्याबरोबरच कचरा, लाकडाचे ओंडकेही वाहत रस्त्यावर आल्याचे चित्र होते. दरम्यान, दुपारनंतरही पावसाची रिपरीप सुरू होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72901 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..