देवगडात नालेसफाईबाबत संयुक्त बैठक बोलवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडात नालेसफाईबाबत
संयुक्त बैठक बोलवा
देवगडात नालेसफाईबाबत संयुक्त बैठक बोलवा

देवगडात नालेसफाईबाबत संयुक्त बैठक बोलवा

sakal_logo
By

L३२७४८

देवगड ः येथील नगरपंचायत मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांना भाजप नगरसेवकांनी निवेदन दिले.
(छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगडात नालेसफाईबाबत
संयुक्त बैठक बोलवा
भाजपची मागणी ः मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः येथील शहरातील नाले आणि गटार सफाईवरून भाजप नगरसेवकांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीला लक्ष्य केले आहे. सुरुवातीच्या पावसातच नगरपंचायतीच्या उपाययोजनेचे तीनतेरा वाजल्याचे निदर्शनास येत असल्याचे नमुद करून याच्या उपाययोजनेसाठी त्वरित संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली. याबाबत भाजप नगरसेवकांनी नगरपंचायत मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांना निवेदन दिले.
येथील शहरातील पावसाळी पाण्याच्या प्रश्‍नावरून भाजप गटनेता शरद ठुकरूल, नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, रुचाली पाटकर यांच्यासह अन्य नगरसेवकांनी मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, विरोधी भाजप नगरसेवकांनी गेले सुमारे दोन महिने पावसापूर्वी देवगड जामसंडे शहरातील गटार, नाले सफाई व्यवस्थित करण्यासाठी वारंवार मासिक सभेमध्ये सूचना केलेल्या होत्या. त्याची पूर्तता केली जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु पहिल्या पावसातच नगरपंचायतीच्या उपाययोजनेचे तीनतेरा वाजल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. देवगड जामसंडेमधील नागरिकांबद्दल सत्ताधारी आणि प्रशासनाला काहीही सोयरसुतक दिसून येत नाही. सत्ताधार्‍यांसह प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी. यापुढे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. या उपाययोजनेसाठी त्वरित एक संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72912 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top