नाईकांच्या मतदारसंघाचा आलेख शून्यच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाईकांच्या मतदारसंघाचा आलेख शून्यच
नाईकांच्या मतदारसंघाचा आलेख शून्यच

नाईकांच्या मतदारसंघाचा आलेख शून्यच

sakal_logo
By

L३२७८२

बाबा मोंडकर

नाईकांच्या मतदारसंघाचा आलेख शून्यच
बाबा मोंडकर ः राणेंचा विरोध दाखवून आमदारकीचा उपभोग
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : मातोश्रीवर निष्ठा ठेवूनही वैभव नाईक यांच्या मतदारसंघाच्या विकासाचा आलेख गेल्या सात वर्षात शून्यच राहिला असल्याची टीका भाजपचे जिल्हा प्रवक्ते विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी पत्रकातून केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, आमदार नाईक फक्त आणि फक्त नारायण राणे यांना विरोध दाखवून दुसऱ्या टर्मची आमदारकी उपभोगत आहेत. निष्ठा आणि दहशतवाद यांचा दिखाऊपणा करून काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नाईक यांनी मतदारसंघाचा विकास मात्र शून्यच केला. मालवण-कुडाळ विधानसभा मतदार संघ राणे यांच्या काळात राज्यात विकासात उतरोत्तर अग्रेसर असताना मतदार संघाच्या विकासाचा आलेख गेल्या सात वर्षाच्या काळात शून्यावर नेऊन ठेवला आहे.
जिल्ह्यात एकमेव कुडाळ-मालवण असा मतदार संघ आहे की जो विविध प्रकारच्या उद्योगधंद्याचे प्रतिनिधित्व करतो. आज कुडाळ एमआयडीसीमधील व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून जगाशी स्पर्धा करत असताना स्थानिक व राज्य सरकारकडे मूलभूत गरजांसाठी धडपडत आहेत. या मतदार संघातील मच्छिमार समाज मूलभूत गरजांसाठी तसेच अनधिकृत मासेमारी व्यवसायामुळे त्रस्त झाला असून त्यांची उपजीविकेसाठी धडपडत चालू आहे. आज पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक जलपर्यटन, होम स्टे, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून तालुका जगाच्या नकाशावर पोचविणाऱ्या स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना पुरोगामी व आवश्यक असलेल्या असलेल्या शासकीय पॉलिसी बदलासाठी धडपड करावी लागत आहे. आज आरोग्य शिक्षण या क्षेत्रातही सर्व वानवा आहे. वास्तविक आमदार होऊन आठ वर्ष होत असून अजूनही मतदार संघाचा शाश्वत विकासासंबंधी कोणतेही नियोजन किंवा प्रलंबित समस्या ऐकून घेण्यासाठी किंवा सोडविण्यासाठी एवढ्या वर्षात एकही मिटींग घेऊ शकले नाही. कोरोना काळातही सर्व व्यापारी वर्गास कुठलीही मदत मिळाली नाही. मतदार संघाच्या विकास प्रक्रियेत आवश्यक असलेली कामे होत नसली तर दिखाऊ निष्ठा काय कामाची.
......

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72965 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..