लांजा ः शांततेचा संदेश द्यायचाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा ः शांततेचा संदेश द्यायचाय
लांजा ः शांततेचा संदेश द्यायचाय

लांजा ः शांततेचा संदेश द्यायचाय

sakal_logo
By

....
rat३०p५.jpg
३२७११
लांजा ः हजयात्रेसाठी चालत जाणाऱ्या तरुणाला पुष्पहार घालून शुभेच्छा देताना लांजा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शौकत नाईक व इतर समाजबांधव. (छाया ः रवींद्र साळवी, लांजा.)
...........
नवसाची करण्या पूर्तता, पायी चालले हजयात्रेला!

लांज्यात सिहाब चित्तूर यांचे स्वागत; करणार ९ हजार कि. मी. चा पायी प्रवास, नवसाची पूर्तता करणार
लांजा, ता. २ ः यापूर्वीदेखील दोन वेळा विमान प्रवासाने हजयात्रा केली आहे; मात्र मागील हजयात्रेवेळी आपण पुढच्यावेळी पायी हजला येऊ, असा नवस केला होता. त्याची पूर्तता म्हणून तो आता पायी हजयात्रा करत आहे, यातून मुस्लिम धर्माची संस्कृती आणि शांततेचा संदेशही देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगितले, अशी माहिती सिहाब चित्तूर या तरूणाने येथे दिली. सिहाब चित्तूर हा तरुण केरळ येथील मल्लपुरम येथून सौदी अरेबियामध्ये असलेल्या मुस्लिम धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान मक्का मदिना येथे पवित्र हजयात्रेसाठी पायी चालत निघालेला असताना त्याचे प्रवासादरम्यान लांजा शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजबांधवांकडून स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पवित्र हजयात्रेला अनन्यसाधारण महत्व असून, दरवर्षी भारताबरोबर जगभरातून अनेक मुस्लिम बांधव हजयात्रेसाठी जात असतात. मुस्लिम समाजातील प्रत्येकाने जीवनात एकदा तरी हजयात्रा केली पाहिजे, असे सांगितले जाते. मक्का मदिना येथे होणाऱ्या पवित्र हजयात्रेसाठी केरळ येथील सिहाब चित्तूर हा ३० वर्षीय तरुण नऊ हजार किलोमीटर इतके अंतर पायी चालत जाणार आहे. हजयात्रेसाठी या तरुणाचा ३० मे पासून केरळमधून प्रवास सुरू झाला असून, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराणमार्गे तो सौदी अरेबियात दाखल होणार आहे. तेथून तो मक्का मदिना येथील २०२३ च्या हजयात्रेला उपस्थित राहणार आहे.
...
चौकट
दररोज २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास
त्याने सांगितले की, यापूर्वीदेखील त्याने दोनवेळा विमानप्रवासाने हजयात्रा केली आहे; मात्र मागील हजयात्रेवेळी आपण पुढच्यावेळी पायी हजला येऊ, असा नवस केला होता. त्याची पूर्तता म्हणून तो आता पायी हजयात्रा करत आहे. हा तरुण दररोज २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास करतो. यातून त्याच्या या पदयात्रेचे जागोजागी स्वागत होत आहे.
..
चौकट
प्रवासासाठी शुभेच्छा
लांजा शहरात दाखल झालेल्या या तरुणाचे शहरातील हजरत सय्यद चाँदशहा बुखारी दरगाह येथे जमातुल मुस्लिमिन लांजातर्फे स्वागत करून त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी लांजा शहरातील तसेच तालुक्यातील मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.
---------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72970 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..