
रत्नागिरी ः भाताच्या गरव्या बियाण्यांना शेतकर्यांकडून मागणी
(कृषिदिन विशेष..........लोगो)
....
rat३०p१७.jpg
L32787
- राजापूर ः सध्या जिल्ह्या लावणीसाठी चिखलणी सुरू झाली आहे
....
हळवी, निमगरवीपेक्षाही भाताच्या गरव्या बियाण्यांकडे कल
पावसाचा कालावधी लांबला; कोरोनानंतर चाकरमानी गावाकडे परतले, भातक्षेत्रात वाढ
राजेश कळंबटे ःसकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः हवामानातील बदलांमुळे मागील तीन वर्षात ऑक्टोबरपर्यंत पाऊस लांबल्यामुळे खरीप हंगामातील भातशेतीवर परिणाम होत आहे. याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांकडून गरवी (१३५ दिवसानंतर उगवणारी) बियाण्यांची खरेदी वाढली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात भातक्षेत्र वाढले असून, उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीनेही शेतकरीवर्ग विचार करू लागला आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानबदल होत असून मागील तीन वर्षात मान्सून परतल्यानंतरही ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच राहते. या बदलाचा फटका कोकणातील भातशेतीला बसत आहे. दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कापलेले भात वाहून गेले होते. हजारो हेक्टरचे नुकसान झाल्याची नोंद आहे. हळवी बियाणे लवकर होत असल्यामुळे अवकाळी पाऊस त्याला मारक ठरत आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांकडून गरवी म्हणजेच उशिराने होणाऱ्या (महान ) बियाण्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात हळवी (१२० दिवसांचे), निमगरवी (१२० ते १३५ दिवस) आणि गरवी (१३५ दिवसांपेक्षा अधिक) बियाणे पेरली जातात. हळवी आणि निमगरवीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असून, गरवी बियाणी शेतकरी विकत घेत आहे. शिरगाव येथील भातसंशोधन केंद्रातून यंदा बऱ्यापैकी गरवी बियाणे खरेदी केली आहेत. काहींनी पावसाचा कल पाहून बियाणेही बदल करून घेतली. ५० टन बियाण्यांपैकी चाळीस टक्केहून अधिक गरवी बियाणे विक्रीला गेली. त्यात रत्नागिरी ८, कर्जत २ आणि सुवर्णा यांचा समावेश आहे.
खरिप हंगामात जिल्ह्यात दरवर्षी ६७ हजार हेक्टरवर भात लागवड होते. कोरोनामुळे मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतले, हाताला काम नसल्यामुळे त्यांनी पडीक शेतजमीन कसण्याचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे मागील दोन वर्षात भातक्षेत्राखालील तीन हजार हेक्टर क्षेत्रात वाढ झाली. गतवर्षी ७० हजार हेक्टरवर भाताची लागवड झाली होती. यंदाही त्याच पद्धतीने लागवड होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यानुसार खरिप हंगामाचे जिल्हा प्रशासनाकडूनही नियोजन केले आहे. शिरगाव भातसंशोधन केंद्र, कोकण कृषी विद्यापीठाकडून दरवर्षी शिफारस केलेल्या भातबियाण्यांची विक्री केली जाते. यंदा सुमारे अडीचशेहून अधिक टन बियाणे विक्री केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भातशेतीकडील कल अजूनही कायम राहिला आहे.
---
दृष्टिक्षेपातील मुद्दे
* लाल भाताच्या बियाण्यांकडे वाढता कल
* काळ्या भातालाही प्रोत्साहन
* कामगारांअभावी थेट पेरणी करून लागवड
* भाताच्या खरेदीला २० रुपये ७० पैसे दर
---
कोट
पाऊस उशिरापर्यंत राहत असल्यामुळे शेतकरीवर्ग खरिप हंगामात गरवी भातबियाणे खरेदी करत आहे. यावर्षी या प्रकारच्या बियाण्यांना मागणी अधिक होती.
- व्ही. व्ही. दळवी, वरिष्ठ संशोधक
..
ग्राफ करावा
बियाणे पेरली जातात...
जिल्ह्यात हळवी बियाणेः १२० दिवसांचे
निमगरवीः १२० ते १३५ दिवस
गरवीः१३५ दिवसांपेक्षा अधिक
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72974 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..