
रत्नागिरी- संस्कृत विश्वविद्यालय उपकेंद्रात
rat30p14.jpg
32756
रत्नागिरी ः कालिदासदिनी संस्कृत विश्वविद्यालयात कवी कालिदासांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना संचालक डॉ. दिनकर मराठे व कर्मचारी.
......
संस्कृत विश्वविद्यालय उपकेंद्रात
कालिदास दिन साजरा
रत्नागिरी, ता. २ ः रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे रत्नागिरी उपकेंद्रामध्ये कालिदासदिनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्या हस्ते कालिदासांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच सायंकाळी निसर्गाच्या सान्निध्यात कालिदास विरचित ‘मेघदूतम्’ या काव्याचे पठण केले. या वेळी संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी उद्बोधनपर भाषणात कालिदासदिनाचे औचित्य सांगितले. समग्र संस्कृत साहित्यातील बहुतांश भाग कालिदासाच्या साहित्याने व्यापला आहे, असे म्हणत राष्ट्रकवी म्हणून जगद्विख्यात असलेल्या कालिदासाच्या प्रसिद्ध ‘सप्तकृतीं’विषयी माहिती दिली. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाकडून कालिदासाच्या ‘रघुवंशम्’ आणि ‘कुमारसंभवम्’ ही महाकाव्ये, ‘मेघदूतम्’ व ‘ऋतुसंहार’ ही खंडकाव्ये, ‘अभिज्ञानशाकुंतलम्’, ‘विक्रमोर्वशीयम्’, ‘मालविकाग्निमित्रम्’ ही नाटके या सात कृतींच्या मराठी भाषेत अनुवादित झालेल्या साहित्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आज विश्वविद्यालयासह संपूर्ण रत्नागिरी ‘कालिदास’मय झाली आहे, असे ते म्हणाले. डॉ. पां. वा. काणे संस्कृत उपकेंद्रातर्फे संस्कृतविषयक नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. रत्नागिरीकर विद्यार्थ्यांनी, संस्कृतप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72986 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..