
गुहागर ः महसूल विभागातर्फे वृक्षारोपण
२ पी १९ः गुहागर
33237
ःगुहागरः वृक्षारोपण करताना तहसीलदार वराळे.
....
गुहागर महसूल विभागातर्फे वृक्षारोपण
वारकरी भजनासहित वृक्षदिंडी; ३ हजार वृक्ष लागवड करणार
गुहागर, ता. २ ः कृषिदिनानिमित्त गुहागर तालुक्यात ३ हजार वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. याचा आरंभ बुधवारी गुहागर शहरातील पोलिस मैदानात करण्यात आला. जनजागृतीसाठी वृक्षदिंडी, पथनाट्य व त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले.
गुहागर तालुका प्रशासनाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमाला समाजापर्यंत पोचवणे आणि पाठबळ मिळण्यासाठी तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी पुढाकार घेतला. वृक्षलागवडीचा उपक्रम सर्वांना सोबत घेऊन व्हावा, यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांना एकत्रित करून बुधवारी आरंभ करण्यात आला. गुहागरमधील गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व खरे-ढेरे-भोसले कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सवाद्य वृक्षदिंडी काढली. मळण पाखरवाडी येथील हनुमान विकास मंडळ वारकरी सांप्रदायांचे वारकरी यांच्या भजनामुळे वृक्षदिंडीची रंगत आणखी वाढली. तहसीलदार वराळे यांच्यासह अनेक अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वृक्षपालखीला खांदा दिला. पोलिस परेड मैदानात वृक्षदिंडी आल्यावर बालभारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्यानंतर पोलिस परेड मैदानाच्या बाजूला उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण केले.
या वेळी तहसीलदार वराळे, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, पोलिस निरीक्षक बी. के. जाधव, ताडगोळ्यांच्या संवर्धनासाठी झटणारे गोल्डसन सॅम्युअल, संतोष वरंडे, अरूण परचुरे, स्नेहा वरंडे, प्रभुनाथ देवळेकर, सुधाकर कांबळे, सचिन गवळी, तलाठी करंबळे, अस्मिता चव्हाण, महेश नित्सुरे, डॉ. घनश्याम जांगीड, डॉ. अमोल गोरे, मंदार छत्रे, वनपाल संतोष परशेट्ये, गुहागर हायस्कूल एनसीसी, खरे-ढेरे-भोसले कॉलेज एनएसएसचे विद्यार्थी, शिक्षक, बालभारती पब्लिक स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
----------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72988 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..