रत्नागिरी ः सामंतांच्या रूपात रत्नागिरी मंत्रिपद मिळण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः सामंतांच्या रूपात रत्नागिरी मंत्रिपद मिळण्याची शक्यता
रत्नागिरी ः सामंतांच्या रूपात रत्नागिरी मंत्रिपद मिळण्याची शक्यता

रत्नागिरी ः सामंतांच्या रूपात रत्नागिरी मंत्रिपद मिळण्याची शक्यता

sakal_logo
By

सामंतांच्या रूपाने रत्नागिरीला पुन्हा मंत्रिपद?

मुख्यमंत्री शिंदे गटातही वजन; समर्थकांमध्ये उत्साह

रत्नागिरी, ता. ३० ः राज्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. भाजप आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट सरकार स्थापन करणार हे निश्चित असले तरी देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक मारत एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय जाहीर केला. आता शिंदे गटाचे वजन वाढले असून, रत्नागिरीला पुन्हा उदय सामंत यांच्या रूपाने मंत्री आणि पालकमंत्रिपद मिळण्याच्या आशा बळावल्या आहेत. त्यामुळे सामंत गटामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाने अनेक राजकीय बदल पचवले आहेत. २०१४ मध्ये झालेला बदलदेखील निष्ठावंत शिवसैनिकांनी मान्य केला. महाविकास आघाडीतील उच्च व तंत्र शिक्षणमंत्री (कॅबिनेट) उदय सामंत यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात उत्तम काम केले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाची छाप पाडली. मंत्री म्हणून तालुक्यात शाश्वत विकासाची अनेक विकासकामे त्यांनी केली. कोट्यवधीचा निधी त्यांनी आणला; मात्र सेनेत उच्च स्तरावर झालेल्या राजकीय भूकंपाचे धक्के संपूर्ण पक्षाला बसले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ त्याला अपवाद राहिला नाही. शिंदे गटाचे पाठबळ वाढत गेल्याने सेनेतील आमदाराच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला तसेच सरकारही अल्प मताने आले. या सर्व राजकारणामध्ये अनेक आमदारांची आमदारकी पणाला लगली. अखेर तांत्रिक सर्व बाजूंचा विचार करून उदय सामंत हे शिंदे गटात सामील झाले. हा गट शिवसेनेचाच आहे, असा दावा शिंदे करत आहेत.
भाजप आणि शिंदे गट अपक्षांना घेऊन सरकार स्थापन करणार, हे निश्चित होते; परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक मारून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केले. शिंदेंबरोबर आलेल्या आमदारांना बोनस म्हणून चांगली मंत्रिपदं देण्याचा निर्णयही भाजपणे घेतला आहे. भाजपच्या या राजकीय खेळीत पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला आहे. सेनेच्या गटाला भाजपने झुकते माप देण्याचा निर्णय घेतल्याने रत्नागिरीला उदय सामंत यांच्या रूपाने पुन्हा मंत्रिपद मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

चौकट
व्यक्तिगत चांगले संबंध
एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांचे ही व्यक्तिगत चांगले संबंध आहेत. पालिकेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात त्यांनी दाखवून दिले. सामंतांनी निधी मागितल्यानंतर मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी मंजूर निधीचा अध्यादेश काढला होता. शिंदे गटातही सामंतांचे वजन असल्याने मंत्रिपदाची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73008 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top