रत्नागिरी ः काजू दुकान फोडून सव्वा 2 लाखाचे काजू लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः काजू दुकान फोडून सव्वा 2 लाखाचे काजू लंपास
रत्नागिरी ः काजू दुकान फोडून सव्वा 2 लाखाचे काजू लंपास

रत्नागिरी ः काजू दुकान फोडून सव्वा 2 लाखाचे काजू लंपास

sakal_logo
By

काजू दुकान फोडून
२ लाखांचे काजू चोरीस

रत्नागिरी, ता. ३० ः मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील काजूचे दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा काजू चोरला. अज्ञातांनी एकाच दुकानातील २ लाख २० हजार ७०० रुपयांच्या काजूची पाकिटे लांबवली. ही घटना काल मध्यरात्री घडली. चोरट्यांनी गेल्या ४ ते ५ महिन्यात हे दुकान दुसऱ्यांदा फोडले.
याबाबत संदेश परशुराम दळवी (वय ४८, रा. आरोग्यमंदिर, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा पत्रा काढून दुकानातील वेगवेगळ्या वजनाच्या एकूण १ हजार १४८ किलो काजूची पाकिटे चोरट्यांनी लंपास केली. यापूर्वीही हे दुकान दोनवेळा फोडण्यात आले. दुकान त्याच पद्धतीने छताचा पत्रा काढून फोडण्यात आले आहे. या प्रकरणी तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73009 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..