जिल्ह्यात आजपासून वृक्ष लागवड अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात आजपासून वृक्ष लागवड अभियान
जिल्ह्यात आजपासून वृक्ष लागवड अभियान

जिल्ह्यात आजपासून वृक्ष लागवड अभियान

sakal_logo
By

जिल्ह्यात आजपासून
वृक्ष लागवड अभियान
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३०ः सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विविध शासकीय, अशासकीय व खासगी संस्थांच्या सहकार्यातून यावर्षी वृक्ष लागवड अभियान हाती घेण्यात आले आहे. १ जुलै हा कृषी दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिनाच्या औचित्याने कृषी प्रतिष्ठानच्या वृक्ष लागवड अभियानाला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, ओरोस येथे जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांच्या हस्ते वृक्ष लागवड अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे.
ओरोस सरपंच प्रीती देसाई व कृषी प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र सावंत उपस्थित राहणार आहेत. माजी खासदार ब्रिगेडीयर सावंत यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात येत्या पाच वर्षांत २० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. यावर्षी सिंधुदुर्गमध्ये १० हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. याची सुरुवात उद्या कृषी दिनापासून करण्यात येत आहे. ही मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कृषी दिनानिमित्त उद्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी झाडे लावण्यात येणार आहेत. या दिवशी कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, ग्रामीण कृषी कार्यानुभव, कृषी विभाग, सैनिक फेडरेशन, वनविभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत कुंदे, किर्लोस, पोखरण, हेदूळ, आडवली, हिवाळे, डॉनबॉस्को स्कूल, देवगड कॉलेज, सावंतवाडी कॉलेज, वेंगुर्ले कॉलेज, रामगड हायस्कूल, बाल शिवाजी स्कूल इत्यादी संस्थांद्वारे विविध ठिकाणी २००० झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. तसेच ३० सप्टेंबर पर्यंत टप्याटप्प्याने झाडे लावून ही मोहीम सुरू राहणार आहे.
निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करावे व वृक्ष लागवड अभियानामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73021 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..