महामार्गावर कामथे घाटात कॉक्रिटीकरणाला तडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर कामथे घाटात कॉक्रिटीकरणाला तडा
महामार्गावर कामथे घाटात कॉक्रिटीकरणाला तडा

महामार्गावर कामथे घाटात कॉक्रिटीकरणाला तडा

sakal_logo
By

rat30p21.jpg
2L32812
- चिपळूण ः कामथे घाटात रस्त्याला मोठी भेग गेली.
....
महामार्गावर कामथे घाटात कॉक्रिटीकरणाला तडा

एकेरी वाहतूक सुरू; दुसऱ्या बाजूनेही दरडीचा धोका
चिपळूण, ता. ३० ः मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामथे घाटात नव्याने चौपदरीकरणाअंतर्गत केलेल्या कॉक्रिटीकरणाला तडा गेल्याचे गुरूवारी सायंकाळी उघड झाले. या घटनेमुळे या मार्गावरील बंद करून दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. महामार्गवर जागोजागी भेगा व तडे पडल्याने चौपदरीकरणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर नमुना पुन्हा एकदा पुढे आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला आता काहीशी गती आली आहे. परंतू अतिशय घाईघाईत कॉक्रिटीकरणाचे काम केले जात आहे. त्याचे परिणाम आता पाऊस सुरू होताच दिसू लागले आहेत. काही दिवसापूर्वीच कापसाळ परिसरातील कॉक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर चौपदरीकरणा अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या गटारांनाही जागोजागी तडे गेल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच अनेक ठिकाणी ही गटारेच कोसळल्याचे उघडकीस आले आहे. त्यापाठोपाठ परशुराम घाटात सवतसडा धबधब्यासमोर कॉक्रिटीकरणाच्या खालील बाजूस असलेला भराव पहिल्याच पावसात वाहून गेला होता. त्यावर तात्पुरती उपाययोजना केली. त्यानंतरही नव्याने केलेल्या कॉक्रिटीकरणाच्या दर्जाविषयी ओरड केली जात आहे. अशातच गुरूवारी पाऊस सुरू असताना कामथे घाटातील कॉक्रिटीकरणाला तडे गेल्याची घटना घडली.
..
चौकट
प्रशासनाची चिंता वाढली
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांनी पोलिसांसमवेत पाहणी केली. तसेच कंपनी व्यवस्थापनाला सूचना करून हा मार्ग वाहतूकीस बंद ठेवला आहे. तर दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. परंतू दुसऱ्या बाजूने देखील दरडीचा धोका कायम आहे. त्यासाठीच पावसाळ्यात दरडीच्या बाजूने वाहतूक बंद ठेवून नव्या मार्गाने वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, आता त्याच मार्गाला तडे गेल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73045 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..