शासकीय मालमत्तेची तोडफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय मालमत्तेची तोडफोड
शासकीय मालमत्तेची तोडफोड

शासकीय मालमत्तेची तोडफोड

sakal_logo
By

शासकीय मालमत्तेची तोडफोड;
ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा

चिपळूण, ता. ३० : ग्रामपंचायत सदस्यानेच गावातील पायवाटेवरील सिमेंट मोरीची तोडफोड केल्याची घटना तालुक्यातील पालवण गावात घडली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण दशरथ सावर्डेकर(२९, रा. पालवण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामसेवक प्रमोद बाळाजी दाते (वय ४७, रा. पालवण) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पालवण गावात भुवडवाडी ते सावर्डेकरवाडी येथील पायवाटेवर सुमारे ७३ हजार ८२५ रुपये खर्च करून सिमेंट पाईपची मोरी बांधण्यात आली होती. या कामावर शासकीय निधी खर्च करण्यात आला होता. तसेच ती सार्वजनिक पायवाट देखील होती. ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले प्रवीण दशरथ सावर्डेकर यांनी त्या मोरीची तोडफोड करून नासधूस केली. त्यामुळे शासकीय व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73061 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..