इचलः महापालिका शिक्कामोर्तब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलः महापालिका शिक्कामोर्तब
इचलः महापालिका शिक्कामोर्तब

इचलः महापालिका शिक्कामोर्तब

sakal_logo
By

अखेर इचलकरंजी
झाली महापालिका
इचलकरंजी, ता.२९ ः इचलकरंजी महापालिकेचा प्रस्ताव अखेर आज मार्गी लागला. यामुळे इचलकरंजी राज्यातील २८ वी महापालिका झाली आहे. याबाबतची अधिसूचना आज नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली. महापालिकेते कामकाज पाहण्यासाठी मुख्याधिकारी श्रेणीतील सुधाकर देशमुख यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. विशेष म्हणजे महापालिका करण्यासाठी सर्व पक्षीय मंडळींनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे महापालिका करण्याच्या प्रक्रियेत राजकीय अडथळा आला नाही.
राज्य शासनाच्या वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर याबाबतच्या हालचाली गेल्या दोन दिवसांपासून सुरु होत्या. महापालिकेच्या प्रस्तावाला आज मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर आता महापालिका झाल्याचा फलक झळकणार आहे. इचलकरंजीची शहराची लोकसंख्या सद्यस्थीतीला साडेतीन लाखांच्या पुढे गेली आहे. वाढत्या नागरिकरणांमुळे विविध नागरी सुविधा पुरविताना पालिका प्रशासनावर ताण पडत होता. त्यामुळे महापालिका करण्याचा प्रस्ताव पुढे आला. खासदार माने यांनी याबाबतचा राज्य शासन पातळीवर यशस्वी पाठपुरावा केला. त्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री व नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी महापालिका करण्याबाबतची घोषणा केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात महापालिका करण्याचा शासनाने इरादा जाहीर करीत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये केवळ सात हरकती व सूचना दाखल झाल्या; पण त्या जुजबी होत्या. त्यामुळे महापालिका करण्याचा मार्ग मोकळा झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73099 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top