संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat1p13.jpg
32867
पावस ः तालुका कृषी अधिकारी अनिल गावित उपस्थितांना मार्गदर्शन करताना.
---------------
हर्डीत पौष्टिक तृणधान्य
दिनानिमित्त कार्यक्रम
पावस ः राजापूर तालुक्यातील हर्डी येथे राजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व ‘आत्मा’अंतर्गत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त पौष्टिक तृणधान्य दिनाचे आयोजन केले होते. कृषी सहायक मस्के यांनी आहारातील नाचणीचे महत्त्व सांगितले. कृषी पर्यवेक्षक तांदळे यांनी चारसुत्री भातलागवडीविषयी मार्गदर्शन केले. मंडल कृषी अधिकारी झेंडे यांनी ‘एमआरईजीएस’ फळबाग लागवड, ‘कृषक’ ॲपविषयी माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी गावित यांनी तृणधान्याचे आहारातील महत्त्व, आवश्यकता, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आदींविषयी मार्गदर्शन केले. या वेळी विजय सुतार, सुनील पडयार, कृषी सहायक इडोले व कृषिसेवक दीपक सोनवणे उपस्थित होते. नाचणी बियाण्यांचे वाटप तालुका कृषी अधिकारी गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
---------------
-rat1p14.jpg
32868
पावस ः राजापूर तालुक्यातील जामदा खोऱ्यामध्ये मासेमारी करणारी तरुण मंडळी.
----------------
मच्छी पकडण्यासाठी लगबग
पावस ः सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे समुद्रामध्ये मच्छिमारीला बंदी असल्याने खवय्यांना अखेर गोड्या पाण्यातील मच्छीचा आस्वाद लुटावा लागणार आहे. राजापूर तालुक्यातील जामदा खोऱ्यामध्ये वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने लहान-मोठ्या नाल्यांमध्ये गोड्या पाण्यातील मच्छी अनेक भागात शिरत असल्याने अनेक तरुण वहाळाचा आश्रय घेत मच्छी पकडण्यात मग्न आहेत. त्यामुळे गोड्या पाण्यातील मासे पकडण्यासाठी अनेक तरुण सरसावले असल्याने मासे खाण्याचा आनंद लुटत आहेत. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने लहान-मोठे मासे जास्त झाल्यामुळे त्याचा फायदा अनेक तरुण उठवत आहेत.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73145 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..