रत्नागिरी- सीए परीक्षेतील बदलांबाबत चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सीए परीक्षेतील बदलांबाबत चर्चासत्र
रत्नागिरी- सीए परीक्षेतील बदलांबाबत चर्चासत्र

रत्नागिरी- सीए परीक्षेतील बदलांबाबत चर्चासत्र

sakal_logo
By

L32863-
rat1p1.jpg
- रत्नागिरी ः सीए इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना शाखेचे अध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर.
--------------
सीए अभ्यासक्रमाच्या पद्धतीत महत्त्वाचे बदल

प्रस्तावित बदलांबाबत सेमिनारमध्ये आचरेकर यांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः भारताच्या उभारणीत बहुमूल्य योगदान देणाऱ्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक पद्धतीत काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत. आधुनिक जगात हा अभ्यासक्रम अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या संदर्भातील विस्तृत माहिती देणारा सेमिनार सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेने मारुती मंदिर येथील व्यंकटेश सेमिनार हॉलमध्ये आयोजित केले. या वेळी १०० विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर, विकास समिती अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, सदस्य सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए केदार करंबेळकर उपस्थित होते. अभ्यासक्रमातील काही बदलांसंबंधी सीए अभिलाषा मुळ्ये यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता पुस्तके, मार्गदर्शन अशा प्रकारचे सहकार्य शाखेकडून करण्यात येते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात सुरवातीला ऑनलाइन माध्यमातून सेंट्रल कौन्सिल मेंबर सीए मंगेश किनरे यांनी बदलत्या अभ्यासक्रमाबाबत विवेचन केले. रत्नागिरीतून अनेक विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला सामोरे जात असतात. करिअर करण्याच्यादृष्टीने अतिशय आव्हानात्मक हे क्षेत्र असून याकरिता भरपूर अभ्यास, मेहनत घ्यावी लागते, असे त्यांनी सांगितले. सीए इन्स्टिट्यूटच्या बोर्ड ऑफ स्टडीचे उपाध्यक्ष सीए विशाल दोशी यांनी या कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सीए अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी आठ महिन्यांनी कमी होणार आहे. आर्टिकलशिपचा कालावधीही दोन वर्षाचा करण्याबाबत आणि स्टायपेंडची रक्कम दुप्पट करण्याचेही प्रस्तावित केले. देशातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून स्थानिक परिसरात यशस्वी सीए होता यावे, या दृष्टीने आयसीएआय कार्यरत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून सीएच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
-----------
चौकट 1
प्रात्यक्षिक आधारित बदलांवर भर
सीए प्रॅक्टिस, आर्टिकलशिप इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षा याबाबतही माहिती देण्यात आली. नव्या बदलांनुसार सीए अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय मानकांचा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा समावेश केला आहे. याला अनुसरून ऑप्शनल विषय म्हणून संविधान विषयाचा समावेश केला. नव्या अभ्यासक्रमात प्रात्याक्षिकांवर आधारित बदलांवर अधिक भर दिला आहे. देशात सीए अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असेही यावेळी सीए दोशी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73151 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..