
विठ्ठल मंदिरात हरिनाम वीणा सप्ताह
विठ्ठल मंदिरात
हरिनाम सप्ताह
सावंतवाडी ः शहरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त १ ते १३ जुलै दरम्यान विठ्ठल हरिनाम वीणा सप्ताह साजरा होणार आहे. तर १० जुलैला आषाढी एकादशी उत्सव होईल. या कालावधीत रोज सायंकाळी महिलांचे भजन, सायंकाळी सहापासून संगीत भजन आणि रात्री आठला वारकरी भजन होईल. शनिवारी (ता.२) केपादेवी वारकरी भजन मंडळ, मूठवाडी-वेंगुर्ले, रविवारी (ता.३) श्री वाटोबा प्रासादिक वारकरी भजन मंडळ, उभादांडा-वेंगुर्ले, ४ ला अचानक वारकरी भजन मंडळ, वेंगुर्ले, ५ ला कीर्तनकार राणे वारकरी संप्रदाय मंडळ, सोन्सुरे-वेंगुर्ले, ६ ला नवार वारकरी भजन मंडळ भेंडमळा- वेंगुर्ले, ७ ला वारकरी भजन होईल. शुक्रवारी (ता. ८) हरिनाम वीणा सप्ताह समारोप दुपारी बाराला होईल. दुपारी महाप्रसाद होईल. १० जुलैला आषाढी एकादशी होणार उत्सव, सायंकाळी सहाला पुणे येथील कीर्तनकार रोहिणी माने-परांजपे यांचे ‘संत चरित्र’ विषयावर कीर्तन, भजन होईल. १३ ला वासुदेव सडवेलकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.
---
अंतिम मतदार
यादीसाठी मुदत
मालवण ः आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यांवर काही नगरपालिकांकडे मोठ्या संख्येने हरकती व सूचना दाखल झाल्याने या नगरपालिकांनी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी राज्यातील ’ब’ आणि ’क’ वर्ग नगरपालिकांना चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. १ जुलैला प्रसिद्ध होणार्या अंतिम मतदार याद्या आता ५ जुलैला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
-------------------
सीईटी अर्ज मोफत
भरण्याची सुविधा
कुडाळ ः येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था (सिंधुदुर्ग) संचलित बॅ. नाथ पै बी. एड महाविद्यालयात बी. एड प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाची आवश्यक असलेली सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) चे अर्ज मोफत भरण्याची सुविधा सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध करून दिली गेली आहे. ३ जुलैला सकाळी १०.३० ते दुपारी १.३० पर्यंत सामाईक प्रवेश परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी प्रा. अरुण मर्गज किंवा अनुष्का रेवंडकर, प्रा. परेश धावडे, प्रा. नितीन बांबर्डेकर किंवा प्रा. योगिता शिरसाट यांच्याशी संपर्क साधावा.
-------------
पाणी पुरवठा
तुळसमध्ये बंद
तुळस ः गेल्या १५ ते २० दिवसांपासून तुळस ग्रामपंचायतचा नळपाणी पुरवठा बंद असून पाण्याविना ग्रामस्थांचे हाल होत आहेत. विजेच्या कमी-जास्त दाबामुळे विद्युत मोटरपंप बिघडत असल्याची ग्रामपंचायतकडून कारणे देण्यात येत आहेत; मात्र त्यासाठी पूर्वीच तरतुद करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73166 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..