खेळातून करिअर घडू शकते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेळातून करिअर घडू शकते
खेळातून करिअर घडू शकते

खेळातून करिअर घडू शकते

sakal_logo
By

L३२९०५

सावंतवाडी ः येथील एम क्रिकेट अकॅडमीच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थी. (छायाचित्र - निलेश मोरजकर)

खेळातून करिअर घडू शकते
दयानंद गवस ः सावंतवाडीत एम क्रिकेट अकॅडमीच्या पुरस्करांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ ः खेळामुळे शारिरीकदृष्टया तंदुरुस्त राहता येते. खेळातून उत्तम करिअरही करता येऊ शकते. त्यासाठी खेळाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहू नका. खेळात सर्वोत्तम योगदान दिल्यास त्यातून चांगले करिअर घडू शकते, असे प्रतिपादन निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी केले. सावंतवाडी येथील एम क्रिकेट अकॅडमीचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच झाला.
यावेळी व्यासपीठावर डॉ. कशाळीकर, डॉ. वझे, दयानंद गवस, अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक, उपाध्यक्ष अक्रम खान, प्रशिक्षक राहुल रेगे आदी उपस्थित होते. अकॅडमीतर्फे तीन विभागात खेळाडूंना गौरविण्यात आले. परफॉरर्मर ऑफ दी इयर या पुरस्कारासाठी १२ वर्षांखालील गटात फरान आगा, उस्मा खान व भगवान पांढरे, १४ वर्षांखालील गटात निशांत शेटकर, १६ वर्षांखालील गटात सोहम पावसकर तर १९ वर्षांखालील गटात रघुवीर सातोसकर या सहा खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. इमर्जिंग खेळाडू म्हणून प्रसाद नाईक, सुहान बांदेकर, ओम मेस्त्री, तन्मय पाटणकर, यश पाटकर, पराग अराबेकर, साजिल खतीब, गौरांग निब्रे व पार्थ नर यांची निवड झाली. अकेडेमिक प्लेयर म्हणून नीरज जाधव व राजाराम गवस यांची निवड करण्यात आली. सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. अध्यक्ष नाईक यांनी अकॅडमीच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी जावेद खतीब, मनोज सातोसकर, उमेश कुबडे, उमेश पांढरे, श्री. दुधवडकर, श्री. कर्णिक, श्री. गगनराज, श्री. कोरगावकर, श्री. पाटकर, सहाय्यक प्रशिक्षक अविनाश जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सावंत तर आभार राहुल रेगे यांनी मानले. यावेळी अकॅडमीचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73176 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top