बांद्यातील शाळांना पुस्तकांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यातील शाळांना पुस्तकांची भेट
बांद्यातील शाळांना पुस्तकांची भेट

बांद्यातील शाळांना पुस्तकांची भेट

sakal_logo
By

L३२९०८

बांदा ः केंद्रशाळेत पुस्तके प्रदान करताना रोटरीचे अध्यक्ष मंदार कल्याणकर व इतर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यातील शाळांना पुस्तकांची भेट

बांदा ः बंगलोर रोटरी क्लबचे सदस्य व रोटरी फाउंडेशनला १०० कोटी रुपयांची देणगी देणारे रविशंकर डाकोजू यांच्या प्रयत्नांतून आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ बांदाने शहरातील विविध शाळांना मौल्यवान पुस्तके भेट दिलीत. शहरातील व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल बांदा, खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा, गोगटे वाळके कॉलेज पानवळ-बांदा, दिव्य ज्योती स्कूल डेगवे आणि जिल्हा परिषद केंद्रशाळा क्रमांक १ बांदा यांना बहुपयोगी इंग्रजी माध्यमाची सुमारे २०० पुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, सचिव फिरोज खान, खजिनदार बाबा काणेकर, सहसचिव शिवानंद भिडे, कार्यक्रमप्रमुख आबा धारगळकर, सदस्य आप्पा चिंदरकर, सदस्य सचिन मुळीक आदी उपस्थित होते. रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73189 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top