मंडणगड- कासवांच्या गावातून 3175 पिल्ले समुद्री प्रवासाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड- कासवांच्या गावातून 3175 पिल्ले समुद्री प्रवासाला
मंडणगड- कासवांच्या गावातून 3175 पिल्ले समुद्री प्रवासाला

मंडणगड- कासवांच्या गावातून 3175 पिल्ले समुद्री प्रवासाला

sakal_logo
By

सकाळ विशेष ...................लोगो
rat१p१५.jpg
३२८७७
वेळासः किनाऱ्यावरून समुद्रात सुरक्षितपणे झेपावताना कासवांची पिल्ले.
-rat१p१६.jpg ः
३२८७८
वेळास किनाऱ्यावरील अंडी सुरक्षित केलेली हचेरी.
----------------

कासवांच्या गावातून ३१७५ पिल्लांचे संरक्षण
वेळासला मोहीम ; ५८८४ अंडी संरक्षित; जन्मदर ५३.९५ टक्के

सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १ ः कासवांचे गाव वेळासच्या किनाऱ्यावरून यावर्षी ऑलिव्ह रिडले कासवांच्या चिमुकल्या ३ हजार १७५ पिल्लांनी अथांग अरबी समुद्रात झेप घेतली. यावर्षी तब्बल ५४ घरट्यांतून ५ हजार ८८४ अंडी हचेरीत संरक्षित करण्यात आली होती. जन्मदराचे प्रमाण ५३.९५ टक्के, असे आश्वासक राहिले.
१७ वर्षे वेळास किनाऱ्यावर कासवांच्या संवर्धनाची मोहीम राबवण्यात येत असून, हजारों पिल्लांचा जन्मोत्सव किनाऱ्याने अनुभवला आहे.
निसर्ग चक्रीवादळानंतर समुद्रातील वातावरणात बदलामुळे कासव विणीचा कालावधी गतवर्षी पुढे गेला होता; मात्र निसर्ग पूर्वपदावर आल्याने यंदाचे कासव विणीच्या हंगामात पहिले घरटे १९ डिसेंबर २०२१ ला आढळून आले. त्यानंतर दिवसेंदिवस हा आकडा वाढतच गेला. निसर्गपूर्वपदाचे आश्वासक वातावरण निर्माण झाले. चिपळूण येथील निसर्गमित्र संस्थेच्या माध्यमातून वेळास येथे २००५ ला सुरू करण्यात आलेल्या कासव संवर्धन प्रकल्पाने यंदा सतराव्या वर्षात प्रवेश केला. वनविभाग, कासवमित्र व स्थानिक प्रशासनाची ही मोहीम ऑलिव्ह रिडेल सागरी कासव संवर्धन प्रकल्प या प्रजातींच्या कासवांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. निसर्ग वादळानंतर गेल्यावर्षी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा कोकण सागरी किनाऱ्यावरील सर्वच प्रकल्पांना फटका बसला. त्यातून आता काही प्रमाणात सावरायला झाले आहे.
या मोहिमेने वेळास गावासह तालुक्याला सातासमुद्रापार वेगळी ओळख दिली आहे. आता येथे कासव संग्राहालयाचा प्रकल्प प्रस्तावित आहे. गेल्या दोन वर्षात वातावरणात झालेले बदल या मोहिमेच्या पथ्थ्यावर पडले आहेत. कासवांच्या जीवनचक्रांचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक या गावास दरवर्षी भेट देतात.
------------------------------
चौकट
दृष्टिक्षेपात
नोव्हेंबर ते मार्च या काळात घरटी शोधून संरक्षित
कासवमित्रांची पहाटे गस्त; वाळूतील नक्षीचा माग
१७ फेब्रुवारीला प्रथम ३० पिल्ले झेपावली
पिल्लांच्या जन्मोत्सवनिमित्त कासव महोत्सव
चार हजार पर्यटकांची सर्व मोसमात हजेरी
उपग्रह टॅगिंग प्रथमा आणि सावनी संपर्काबाहेर
---------------------------
चौकट

वर्ष घरटी अंडी झेपावलेली पिल्ले
२०१९ २१ २२३५ ९४१
२०२० २३ २७१५ ११४८
२०२१ ४४ ४८१८ २१५०
२०२२ ५४ ५८८४ ३१७५

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73254 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top