
रत्नागिरी-मासेबाव परिसरातील लावणीची लगबग
फोटो येत आहे
..
-rat1p28.jpg- मासेबाव (ता. रत्नागिरी) ः मासेबाव परिसरात शेतकऱ्यानी लावणीला सुरवात केली आहे. (छायाचित्र ः कपिलानंद कांबळे)
-------------
मासेबाव परिसरातील लावणीची लगबग
रत्नागिरी, ता. २ ः गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली. अनेक सखल भागात पाणी साचले असून, अशातच बहुतांश ठिकाणी भातलावणीची कामे सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मासेबाव, करबुडे या ठिकाणासह इतर ठिकाणी भातलावणीची लगबग सुरू झाली आहे.
तालुक्यात दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत आहे. पाच ते सहा दिवसांपासून जोरदार पावसाचा इशारा हवामान खाते देत आहे. तालुक्यात आठ दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. पावसाच्या सरींमुळे भातखाचरांमध्ये पाणी साचलेले आहे. या पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पॉवर टिलरने नांगरणी करून भातलावणीला सुरवात केली आहे. आठ दिवसांपासून बरसत असलेल्या चांगल्या पावसाने भातखाचरामध्ये चांगले पाणीदेखील आले. यामुळेच चांगले भातपीक येण्याच्या उद्दिष्टाने पाण्याची सोय झालेल्या शेतकऱ्यांनी भातलावणीला सुरवात केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73270 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..