लांजा-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-संक्षिप्त
लांजा-संक्षिप्त

लांजा-संक्षिप्त

sakal_logo
By

-rat१p११.jpg
32865
लांजा ः वेरळ येथील नागरिकांना मार्गदर्शन करताना मंडल अधिकारी रोहिदास राठोड.
-----------------------
वेरळमध्ये उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप
लांजा ः गरजू नागरिकांच्या सोयीसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांसाठी शालेय व्यवस्थापन समितीने आयोजित केलेले हे शिबिर नागरिकांचा पैसा आणि वेळ वाचवणारे ठरले आहे, असे मत पुनस कार्यालयाचे मंडल अधिकारी रोहिदास राठोड यांनी व्यक्त केले. तहसीलदार कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समिती वेरळ, मंडल अधिकारी पुनस कार्यालय आणि तलाठी कार्यालय, वेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेरळ येथील नागरिकांच्या सोयीसाठी उत्पन्नाचे दाखले वाटप आणि ‘ई-पीक पाहणी’संदर्भात मार्गदर्शन आयोजित केले होते. या प्रसंगी मंडल अधिकारी रोहिदास राठोड बोलत होते. या वेळी रवींद्र साळवी, शरद चरकरी, तलाठी एंडरकाये, तलाठी राजेंद्र मळवीकर, महेश गुंडये आदी उपस्थित होते.
-----------
-rat१p२०.jpg
32887
खेड ः शहरातील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे भाजप, तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करताना शिवसेना कार्यकर्ते.
---------------
भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष
खेड ः मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रिपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनला शपथ घेतल्यानंतर खेडमध्ये रात्री उशिरा शिवसेनेने व भाजप कार्यकर्त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी जल्लोष केला. राज्यात जुळलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या नवीन समीकरणाचे पडसाद आता कोकणात उमटू लागले आहेत. गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिवसेना शिंदे गटाचे समर्थन खेड-दापोली-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी केले. त्यांच्या या निर्णयाचे संमिश्र पडसाद मतदार संघात उमटले आहेत. दरम्यान, नवीन शिवसेना-भाजप युती सरकारच्या स्थापनेचे संकेत शपथविधी झाल्यानंतर मिळाल्यानंतर खेडमध्ये गुरुवारी रात्री उशिरा श्री सिद्धिविनायक मंदिर येथे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला; तर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत जल्लोष केला.
------------
-rat१p२१.jpg
L32888
खेड ः दापोली मार्गावर नारिंगी नदीकिनारी पडलेले खड्डे.
---------
खेड-दापोली मार्गाची झाली चाळण
खेड ः तालुक्यातील एक प्रमुख राज्यमार्ग असलेल्या खेड-दापोली रस्त्याची मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच चाळण झाली आहे. या मार्गावर नारिंगी नदीकिनारी मोठमोठे खड्डे पडले असून, अपघात होण्याची भीती वाहनचालकांतून व्यक्त होत आहे. खेड-दापोली या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. मुसळधार पाऊस सुरू झाला असल्याने या खड्ड्यात चिखल पाणी साचून धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. दुचाकी व चारचाकी चालकांना या भागात कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. खेड ते दापोली मार्गावर सतत वर्दळ असते; मात्र तरीदेखील या मार्गाच्या नारिंगी नदीकिनाऱ्‍यावरील भागात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देताना दिसत नाही. येथे विटांचे तुकडे टाकून डांबरी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले गेले असले तरी मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर ही मलमपट्टी कुचकामी ठरली आहे.
------------
-rat१p२२.jpg
32893ः खेड ः अलसफा वेल्फेअर फाऊंडेशनतर्फे गणवेश वाटप करताना फाऊंडेशनचे पदाधिकारी
------------
‘अलसफा वेल्फेअर’तर्फे गणवेश वाटप
खेड ः शहरातील अलसफा वेल्फेअर फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना गणवेशासह शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. याचवेळी ‘यूपीएससी’ परीक्षेत चमकलेल्या अक्षय महाडिक याचाही या वेळी गौरव करण्यात आला. या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष शमशुद्दीन खान, दानिश पोत्रिक, मोहसीन शेख, सर्फराज पोत्रिक, जुबेर कुर्णे, बिलाल जुईकर, अनिक सदरे, आरिफ मुल्लाजी, जावेद कौचाली, सर्फराज पांगारकर, यासिन पोत्रिक, सलीम पोत्रिक, वहीद कडवेकर, फारुख मणियार, मुख्त्यार सुर्वे, हसनमियाँ रिफाई उपस्थित होते.

---

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73286 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..