लांजा ः पोलिसांना पाचारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा ः पोलिसांना पाचारण
लांजा ः पोलिसांना पाचारण

लांजा ः पोलिसांना पाचारण

sakal_logo
By

rat१p२७.jpg
३२९१५
लांजाः रेशन दुकानवर झालेली गर्दी.
------------------
रेशन दुकानाशी गोंधळ,
पोलिसांना पाचारण
लांजातील प्रकार ; आजच धान्य न्या फतव्याला विरोध
लांजा, ता. १ ः धान्य दुकानात आलेले रेशन एका दिवसात घेऊन जा उद्या मिळणार नाही, या प्रशासन आणि रेशन दुकानदाराच्या फतव्याविरोधात ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ग्राहकांच्या आक्रमक भूमिका आणि गोंधळामुळे अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर पोलिस बंदोबस्तात ग्राहकांना रेशन देण्याची वेळ येऊन ठेपली. गुरुवारी (ता. ३० जून) लांजा येथील रेशन दुकान नं. ३ या ठिकाणी हा प्रकार घडला. रेशन देण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
लांजा शहरातील रेशन धान्यदुकान नं. ३ यावर रोहिदासवाडी, डाफळेवाडी, पानगलेवाडी, तीन कुंभारवाड्या तसेच देवराई आगरवाडी या वाड्यांबरोबरच विवली, केळंबे आणि धुंदरे येथील सुमारे ७५५ कार्डधारक आहेत. गेला महिना रेशन नसल्याने दुकानावर खडखडाट होता; मात्र रेशन आल्यानंतर गुरुवारी ३० जूनला ग्राहकांनी रेशन नेण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी केली होती; मात्र या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना संबंधित रेशन दुकानदारांनी आजच्या आज तुम्ही तुमचे रेशन घेऊन जा, उद्या तुम्हाला मिळणार नाही, असा फतवा काढल्याने ग्राहक हैराण झाले.
लोकांमध्ये गोंधळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर लांजा पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात या ठिकाणी ग्राहकांना रेशन देण्यास सुरवात झाली; मात्र साडेसातशे ग्राहकांना एका दिवसात रेशन देणार कसे हा प्रश्नदेखील या निमित्ताने पुढे आला. दरम्यान, संतप्त झालेल्या रेशन ग्राहकांनी पुरवठा शाखेतील अधिकाऱ्यांना भेट दिली आणि आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी रेशन देण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73289 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..