रत्नागिरी ः विद्यार्थ्यांसाठी दीनदयाळ स्पर्श योजना शिष्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः विद्यार्थ्यांसाठी दीनदयाळ स्पर्श योजना शिष्यवृत्ती
रत्नागिरी ः विद्यार्थ्यांसाठी दीनदयाळ स्पर्श योजना शिष्यवृत्ती

रत्नागिरी ः विद्यार्थ्यांसाठी दीनदयाळ स्पर्श योजना शिष्यवृत्ती

sakal_logo
By

पोस्टाच्या तिकिटांच्या छंदासाठी शिष्यवृत्ती

विद्यार्थ्यांसाठी दीनदयाळ स्पर्श योजना; टपाल विभागाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः शालेय विद्यार्थ्यांना पोस्टाच्या तिकीट संग्रहामध्ये रुची निर्माण व्हावी, यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे ‘फिलाटेली’ (पोस्टाची तिकिटे जमवण्याचा) छंद जोपासणाऱ्यांसाठी दीनदयाळ स्पर्श योजना सुरू केली आहे. ‘फिलाटेली’ हा छंद जोपासणाऱ्यांसाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
योजना सहावी ते नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. शिष्यवृत्तीची रक्कम ५०० रुपये प्रतिमाह दराने मिळेल. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत शिकणारा असावा, त्याचबरोबर वार्षिक परीक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण (अनुसूचित जाती, जमातीमधील विद्यार्थ्यांना ५५ टक्के) असणे किंवा समतुल्य श्रेणी किंवा ग्रेड पॉइंट असणे बंधनकारक आहे. शाळेचा ‘फिलाटेली क्लब’ असावा आणि संबंधित विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असणे आवश्यक आहे. जर शाळेचा क्लब नसेल तर त्या संबंधित विद्यार्थ्यांचे स्वतंत्र ‘फिलाटेली अकाउंट’ असणे आवश्यक आहे. प्रकल्पाचा विषय सर्कल ऑफिसद्वारा देण्यात येणार असून, टपाल खात्याचे प्रतिनिधी आणि प्रसिद्ध ‘फिलाटेलिस्ट’ यांचा समावेश असलेली एक समिती सर्कल पातळीवर स्थापन केली जाईल. त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पाचे मूल्यमापन केले जाईल.
‘फिलाटेली’ प्रकल्प कार्यावरील मूल्यांकन किंवा सर्कल ऑफिसकडून आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेतील कामगिरीवर विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. सर्कल ऑफिसद्वारा शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत पोस्ट ऑफिस, बचत बँकेचे संयुक्त खाते किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडावे लागेल. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्जासाठी जवळील पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा. आपले अर्ज नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत जमा करावेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73297 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top