इन्सुलीत दारु पकडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इन्सुलीत दारु पकडली
इन्सुलीत दारु पकडली

इन्सुलीत दारु पकडली

sakal_logo
By

33073
इन्सुली ः येथे संशयित व मुद्देमालासह अधिकारी व कर्मचारी. (छायाचित्र ः निलेश मोरजकर)

इन्सुलीत दारु पकडली

मालवणचा एक ताब्यात; पाठलाग करुन एक्साईजची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ ः बेकायदा गोवा बनवायची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मालवण येथील एकाला पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे. रोहन रजनीकांत पेंढुरकर (वय ३४ रा. मुस्लिम मोहल्ला एसटी डेपोच्या मागे, मालवण ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ५७ हजाराच्या दारूसह स्वीफ्ट कार असा मिळून तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल (ता.३०) ओटवणे -माजगाव रस्त्यावर करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क खात्याचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याहून येणाऱ्या अवैध मद्याची तस्करी रोखण्यासंदर्भात इन्सुली येथे तपासणी नाक्यावर संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी बांद्याहून इन्सुलीच्या दिशेने येणारी कार (क्रमांक MH - ४८ - A५३६६) चालकाने अचानक वळवून बांद्याच्या दिशेने निघाला. या वाहनाचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करुन ओटवणे-माजगांव रस्त्यावर हे वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता डीकीमध्ये गोवा बनावटीच्या दारुचे एकूण ८ बॉक्स म्हणजेच ५७ हजार १२० किंमतीचा मद्यसाठा व ३ लाखाची कार (स्विफ्ट डिझायर व्हीडीआय) असा एकूण रुपये ३ लाख ५७ हजार १२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये निरीक्षक एस. पी. मोहिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक प्रदिप रास्कर व सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे तसेच तात्पुरता तपासणी नाका इन्सुली येथील अधिकारी निरीक्षक एस. के. दळवी, दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, जवान डी. आर. वायदंडे, डी. डी. कापसे यांनी भाग घेतला. या प्रकरणी पुढील तपास सीमा तपासणी नाका, इन्सुली दुय्यम निरीक्षक रास्कर करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73315 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..