कुंदेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंदेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कुंदेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कुंदेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

sakal_logo
By

33170
कुंदे ः काजू कलमांची लागवड करताना मान्यवर.

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत
कुंदेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सिंधुदुर्गनगरी, ता. २ ः महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुडाळमार्फत कृषी संजीवनी मोहीम २०२२-२३ अंतर्गत कुंदे येथे क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम श्री. प्रकाश तायशेटे यांच्या घरी पार पडला.
किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख भास्कर काजरेकर यांनी जमीन आरोग्य पत्रिका आधारित भात, काजू, आंबा व नारळ पिकांचे खत व्यवस्थापन व खतांच्या मात्रा काढणे याबाबत मार्गदर्शन केले. ‘समृद्ध व आनंदी गाव’ या कार्यक्रमाबद्दल व दहा हजार वृक्ष लागवड मोहिमेबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या हस्ते उपस्थित शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या. महाराट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकरी श्री. कृष्णा खांदारे यांच्या क्षेत्रावर काजू कलमे लागवडीचा प्रारंभ करण्यात आला. कृषी पर्यवेक्षक ए. टी. परब (कडावल) यांनी कृषी यांत्रिकीकरणाबाबत व कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन केले. आंब्रडचे कृषी सहाय्यक श्री. एस. एस. तांबोळी यांनी ‘श्री’ पद्धतीने भात लागवडीविषयी माहिती दिली. शेतकरी रुपेश तायशेटे यांचा प्रक्षेत्रावर याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी श्रीमती एस. एस. परब, गावराई कृषी सहाय्यक श्रीमती पी. एस. खरवडे, हिर्लोक कृषी सहाय्यक डी. एल. गावित आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73473 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..