दाभोळ-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-संक्षिप्त पट्टा
दाभोळ-संक्षिप्त पट्टा

दाभोळ-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

फोटो काल सोडले आहे
..
-rat2p11.JPG ः पोफळी ः गावातील फैसल सय्यद याला दिव्यांग समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
33176
-----
फैसल सय्यद यांना समाजरत्न पुरस्कार
चिपळूण ः पोफळी सय्यदवाडी येथील दिव्यांग कार्यकर्ता फैसल इब्राहिम सय्यद याला मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई या संस्थेचा राज्यस्तरीय दिव्यांग समाजरत्न पुरस्कार मिळाला. नुकतेच मुंबई येथे त्याला या पुरस्काराने गौरवण्यात आले. या यशाबद्दल फैसल सय्यद याने पोफळी गावातील ग्रामस्थांचा प्रेम व आपुलकीची साथ यामुळे मला हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. परिसरात त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
----------
-rat2p12.jpg
L33177
ः चिपळूण ः कृत्रिम अवयव रोपण शिबिरात दिव्यांग बंधूंसमवेत रोटरीचे पदाधिकारी.
--------
दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप
चिपळूणः रोटरी क्लब ऑफ चिपळूण, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघात मोफत कृत्रिम हात व पाय शिबिर मागील महिन्यात घेतले होते. या शिबिरात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, विरार, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील सुमारे १०० हून अधिक दिव्यांगांना आवश्यक असलेले कृत्रिम अवयव देण्यात आले. हजारो रुपये किमतीचे साहित्य मोफत मिळाल्याने दिव्यांगाना मोठा दिलासा मिळाला. कृत्रिम अवयव रोपण शिबिर घेतले होते. सुरवातीला त्यांना आवश्यक असलेल्या कृत्रिम हातापायाची मापे घेण्यात आली. या शिवाय ज्या दिव्यांग बांधवांना कॅलिपर कुबड्या व्हीलचेअर, काठी, कुबड्या, स्टिक याची आवश्यकता आहे त्यांनाही ती उपलब्ध करून दिली. सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सांगली, कोल्हापूर येथून दिव्यांग बांधव शिबिरासाठी दाखल झाले होते. शिबिरासाठी रोटरीचे अध्यक्ष प्रसाद सागवेकर व त्यांच्या टीमने मेहनत घेतली.
---------
-rat2p1४.jpg
33179
देवरूख ः गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करताना नगरसेविका किर्वे आदी.
----------
नगरसेविका किर्वेकडून विद्यार्थ्यांना साहित्य
देवरूख ः गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा बुद्ध्यांक वाढवण्याबरोबरच त्यांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी शिक्षकांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन नगरसेविका रेश्मा किर्वे यांनी केले. आपल्या भागातील लहानग्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून किर्वे यांच्या सौजन्याने देवरूख मोरेवाडी जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तुकाराम किरवे, सचिन मोरे, मुख्याध्यापिका साठे, शिक्षिका राठोड, गुरूप्रसाद मोरे आदी उपस्थित होते. कोरोना काळ संपून दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा शाळा उघडल्या व शाळेची घंटा वाजली आहे.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73487 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..