
विद्यार्थ्यांनी संशोधनशील बनावे
33191
नडगिवे ः येथे शेतकऱ्यांचा सन्मान करताना मान्यवर. (छाया ः अनिकेत जामसंडेकर)
विद्यार्थ्यांनी संशोधनशील बनावे
राजेंद्र भोरे ः नडगिवेत कृषिदिनी शेतकऱ्यांचा गौरव
तळेरे, ता. २ ः विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी जे जे काही करता येईल, ते करण्यासाठी संशोधनशील बनावे व तसा अभ्यास करावा, असे प्रतिपादन विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोरे यांनी केले.
आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, नडगिवे येथे हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कृषी दिन साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भोरे बोलत होते. यावेळी शेतकरी प्रकाश शिर्सेकर, मधुकर पाटील, दिलीप मण्यार, संतोष आडविलकर, दिनेश ठुकरूल, लक्ष्मण घाडी यांना सन्मानित केले. यावेळी प्रशालेतील दुसरीतील विद्यार्थिनी श्रुती कावळेने शेतकऱ्यांचा जीवनपट उलगडणारी कविता सादर केली. तिसरीतील विद्यार्थिनीने प्रशालेतील शिक्षिका संपदा पाटील यांनी लिहिलेले गीत सादर केले. मराठी विषय शिक्षिका तेजश्री भोकरे यांनी शेतकऱ्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर विशद केला.
यावेळी शेतीची सद्यस्थिती, शेतमालाला मिळणारा भाव आणि बदलते हवामान, तसेच विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञाचा अधिकाधिक वापर करून शेती करण्यास प्रोत्साहित करावे. तसेच नवनवीन आधुनिक तंत्रज्ञाननिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, आदी मुद्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे निवेदन प्रशालेतील शिक्षक ओंकार गाडगीळ यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73502 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..