केसरकर लोकांच्या मनातून उतरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केसरकर लोकांच्या मनातून उतरले
केसरकर लोकांच्या मनातून उतरले

केसरकर लोकांच्या मनातून उतरले

sakal_logo
By

33192
डॉ. जयेंद्र परुळेकर

केसरकर लोकांच्या मनातून उतरले

डॉ. जयेंद्र परुळेकर ः ‘त्या’ आरोपांबाबत खुलासा करा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः आमदार दीपक केसरकरांना मंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. त्यामुळेच ते शिवसेना नेत्यांवर टीका करीत आहेत; मात्र केसरकर जनतेच्या मनातून उतरले असून, बंडखोरीसाठी घेतलेल्या पैशांचा जो आकडा जनतेत फिरत आहे, त्याचा केसरकरांनी खुलासा करावा, असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे लगावला.
आठ वर्षांपूर्वी शिवसेनेत आलेले केसरकर हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे नाव घेऊन एकनिष्ठता सांगत असतील, तर काँग्रेसमध्ये असताना हिंदुत्व आणि एकनिष्ठता कुठे होती, असा प्रश्नही त्यांनी केला. श्री. परुळेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत श्री. केसरकर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘बंडखोरी ही हिंदुत्वासाठी आणि निष्ठेसाठी केली, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते श्री. केसरकर करत आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन पक्षात काम केले. काँग्रेसमधून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश केला. या काळात त्यांनी तीनही पक्षांशी गद्दारी केली आहे. असे केसरकर एकनिष्ठ कसे म्हणता येतील? आज बाळासाहेब असले असते, तर ‘मातोश्री’च काय, मुंबईतही या गद्दारांना फिरू दिले नसते. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा प्रचार अशा गद्दारांनी करू नये. केसरकरांना मतदारांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून दिले होते. त्यामुळे त्यांची गद्दारी कोणालाच पटली नाही. त्यांनी कोणतेही मंत्रिपद घेऊन मतदारसंघात यावे, ते शिवसेनेचे मुळीच नसतील. त्यामुळे त्यांचे स्वागत कसे करायचे, हे जनताच ठरवेल.
---
चौकट
किती जणांना रोजगार दिला?
परुळेकर म्हणाले की, ‘‘केसरकरांनी भाजपसोबत युती असताना शिवसेनेतून पाच वर्षे पालकमंत्रिपद उपभोगले. या काळात त्यांनी जिल्ह्यातील किती युवकांना रोजगार दिला, हे सांगावे. रोजगाराच्या गोष्टी नुसत्या कागदावर न सांगता प्रत्यक्षात फिरून जिल्ह्यातील त्या युवकांना दाखवून द्याव्यात.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73503 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top