कृषीदिनी वृक्षारोपणाद्वारे जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषीदिनी वृक्षारोपणाद्वारे जनजागृती
कृषीदिनी वृक्षारोपणाद्वारे जनजागृती

कृषीदिनी वृक्षारोपणाद्वारे जनजागृती

sakal_logo
By

वृक्षारोपणाद्वारे जिल्ह्यात जागृती

कृषीदिनाचा उत्साह; चिमुकल्यांचाही सहभाग, शाळांमध्ये रंगल्या विविध स्पर्धा

लीड
हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी जिल्ह्यात कृषीदिन साजरा करण्यात आला. विविध शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. चिमुकल्यांनी ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणा दिल्या. तसेच शेतकऱ्यांचा गौरव करून कृतज्ञता व्यक्त केली.
-----------

33169
वर्दे ः येथील शाळेत मुलांना काजू रोपांचे वाटप करताना कृषीदूत.

वर्देत दोनशेवर वृक्षारोपण
सावंतवाडी ः छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांमार्फत वर्दे गावात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काजू आणि सुपारीच्या दोनशे झाडांचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित कृषिदूत अवधूत देवधर, अरबाज पठाण, निरंजन भोगले, आकाश कदम, ओंकार कदम, आदिनाथ कांबळे, गोविंद खानोलकर, मूड वीरांजनेयुलू नाईक आणि जांबुलडिन्ने उदय किरण यांनी प्रस्ताविक केले. माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत, प्राचार्य सौ. सामंत, कार्यक्रम समन्वयक एन. ए. साईल आणि प्राध्यापक जी. डी. गायकी यांचे मार्गदर्शन विद्यार्थी कृषिदुतांना लाभले. सरपंच अपर्णा सुतार, उपसरपंच ॲड. विष्णू सावंत, ग्रामसेवक श्री. कविटकर, माजी सरपंच दिलीप सावंत, जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा नं. १ मधील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्रदीप सावंत यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक श्री. भालचंद्र जाधव यांनी आभार मानले.
-------
33206
मडुरा ः वृक्षारोपणासाठी सज्ज झालेले व्ही. एन. नाबर प्रशालेचे विद्यार्थी.

मडुरा नाबर प्रशाला
बांदा ः मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत कृषी दिन उत्साहात साजरा झाला. पाडलोस कृषी तंत्र विद्यालयाच्या सहशिक्षिका शालन गवस यांनी विद्यार्थ्यांना कृषी दिन व जीवनात झाडांचे महत्त्व यासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेच्या आवारात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगावकर, सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिग्ज, प्राची परब आदी उपस्थित होते.
..............
33204
आकेरी ः रंगभरण स्पर्धेत सहभागी विद्यार्थी.

आकेरी शाळा
सावंतवाडी ः माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त आकेरी नं. १ या प्रशालेत कृषी दिन उत्साहात साजरा झाला. मुख्याध्यापिका श्रीमती दाभोलकर यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व प्रतिमा पूजन केले. शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दुपारच्या सत्रात रंगभरण, घोषवाक्य, निबंध आदी स्पर्धा झाल्या.
--
33205
चिंदर ः वृक्षारोपण करताना विद्यार्थी व अन्य.

चिंदरमध्ये वृक्षारोपण
आचरा ः कृषी दिनानिमित्त चिंदर ग्रामपंचायत येथे उपसरपंच दीपक सुर्वे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मालवण पंचायत समिती माजी सभापती धोंडू चिंदरकर, तलाठी योगेश माळी, पंच सदस्य शशिकांत नाटेकर, शिक्षक रतन बुटे, निशिगंधा वझे, वासंती घाडी, रोहिणी केळसकर, ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगावकर, रणजित दत्तदास, दिगंबर जाधव, राजू पालकर, विद्यार्थी उपस्थित होते.
--
33203
इन्सुली ः सुपारी लागवड कार्यक्रमात सहभागी विद्यार्थिनी.

इन्सुलीत सुपारी लागवड
सावंतवाडी ः उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी कृषीदिनानिमित्त ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत इन्सुली येथील श्री. दिलीप गावडे यांच्या बागेमध्ये सुपारीची लागवड केली. सिद्धेश गावडे व प्रिया आरोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिया नंदेश्वर, वैभवी भुवड, संस्कृती साळगावकर, मनाली शिंदे, मिताली उळे, वेदिका साळवे, हर्षाली राठोड आदींनी उपक्रमात सहभाग घेतला.
--
33190
कासार्डे ः केंद्रशाळा नं. २ च्यावतीने काढलेली वृक्षदिंडी.

कासार्डेत वृक्षदिंडी
तळेरे ः कासार्डे केंद्रशाळा नं. २ शाळेच्या विद्यार्थ्यांनी कृषी दिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला. यानिमित्त विविध घोषणा देऊन वृक्षदिंडी काढण्यात आली. शाळा ते ग्रामपंचायत कार्यालय अशी जनजागृती फेरी काढली. यावेळी ‘झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा’, असा संदेश देण्यात आला. सरपंच बाबू तानवडे यांनी वृक्षारोपणासाठी झाडे दिली.
--
33165
वेंगुर्ले ः वृक्षारोपण करताना मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे.

वेंगुर्लेत वृक्षारोपण
वेंगुर्ले ः पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वेंगुर्ले पालिकेतर्फे शहरात विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. याचा प्रारंभ आज कृषी दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत पर्यटनस्थळ येथे मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते झाला. जांभूळ, बेहडा, कोकम, पिपळ, पळस, पेरू, आवळा आदी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. दरम्यान, यावेळी पालिकेचे वैभव म्हाकवेकर, अशोक गिरप आदी उपस्थित होते.
--
33234
वेंगुर्ले ः दहा हजार वृक्ष लागवडीचा प्रारंभ करताना प्राचार्य देऊलकर.

‘दहा हजारावर झाडे लावणार’
वेंगुर्ले ः ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गमार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा हजारावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ आज येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला. कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गचे अधिकारी डॉ. केशव देसाई, प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, प्रा. विरेंद्र देसाई, प्रा. सूर्यवंशी, प्रा. चुकेवाड, प्रा. आनंद बांदेकर, प्रा. वेदिका सावंत आदी उपस्थित होते. प्रा. देसाई व नगरसेवक विधाता सावंत यांचे सहकार्य लाभले.
--
33167
सावंतवाडी ः अंगणवाडी क्र. ६६च्या परिसरात वृक्षारोपण करताना चिमुकले.

चिमुकल्यांचाही सहभाग
सावंतवाडी ः येथील माठेवाडा जिल्हा परिषद शाळा क्र. २ मधील अंगणवाडी क्र. ६६ च्या चिमुकल्यांनी वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा केला. ‘एक तरी झाड लावा’ असा संदेश चिमुकल्यांनी दिला. यावेळी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा घोषणा देत शाळेच्या आवारामध्ये वृक्षारोपण केले. नूतन पोकळे, नुपूर पोकळे, वेदांगी पेडणेकर, श्री. नेवगी, स्निग्धा प्रभू, सुकम करमळकर, इशिता कडगावकर, आरुष धारगडकर आदी सहभागी झाले. अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर यांनी मार्गदर्शन केले.
--
33166
सावडाव ः येथे विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करताना मान्यवर.

सावडावला रोपांचे वाटप
नांदगाव ः सावडाव (ता.कणकवली) येथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कृषी दिन साजरा झाला. सरपंच दत्ता काटे, ग्रामसेवक शशिकांत तांबे, वैभव सावंत, नयना सावंत, पंच सदस्य दीपक वारंग, जयश्री गावकर, वैशाली पुजारे, रश्मी जाधव, सुविधा लोके, उत्तम वारंग, अंकुश वारंग, अशोक वारंग, विजय कदम, मुख्याध्यापक लोकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73529 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top