बांदा नं. 1 केंद्रशाळेत कृषी दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा नं. 1 केंद्रशाळेत
कृषी दिन उत्साहात
बांदा नं. 1 केंद्रशाळेत कृषी दिन उत्साहात

बांदा नं. 1 केंद्रशाळेत कृषी दिन उत्साहात

sakal_logo
By

33230 (फोटो तीन कॉलम)
बांदा ः केंद्रशाळेत कृषी दिनी एकवटलेले विद्यार्थी व शिक्षक. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यात टाकावूपासून फिरती बाग

केंद्रशाळेचा उपक्रम; डबा, कॅनपासून बनवल्या कुंड्या

बांदा, ता. २ ः जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेत कृषी दिनाचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून फिरती बाग साकारली आहे. या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
कृषी दिन बांदा केंद्रशाळेत विविध उपक्रमांनी उत्साहाने साजरा करण्यात आला. शालेय‌ वयातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी शाळेत वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येते. कृषी दिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांनी टाकाऊ बॉटल, डबा, कॅन, बादली, बरणी अशा वस्तूंपासून कुंडी तयार केली. या कुंडीची आकर्षक सजावट करून आणण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमाला प्रतिसाद देत शाळेतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध ‌प्रकारच्या आकर्षक कुंड्या बनवून आणल्या व त्यांची शाळा परिसरात मांडणी केली. या दिवशी शालेय‌ परिसरात ५० रुपये याप्रमाणे एक फुलझाड विकत घेऊन शाळेच्या बागेत लावण्याचे पालक व पर्यावरणप्रेमी यांना आवाहन केले होते. या उपक्रमालाही पर्यावरणप्रेमींनी प्रतिसाद देत शाळेला अनेक फुलझाडे भेट दिली. बांदा येथील कृषी मंडल अधिकारी प्रकाश घाडगे यांनीही ५० सुपारीची रोपे शाळेला भेट दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73569 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..