देवगड पंतवालावलकर महाविद्यालयास पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड पंतवालावलकर महाविद्यालयास पुरस्कार
देवगड पंतवालावलकर महाविद्यालयास पुरस्कार

देवगड पंतवालावलकर महाविद्यालयास पुरस्कार

sakal_logo
By

33232
ओरोस ः पुरस्कार स्विकारताना प्रभारी प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे, उपप्राचार्य सुरेश कर्लीकर.

देवगड पंतवालावलकर
महाविद्यालयास पुरस्कार
देवगड, ता. २ ः येथील शिक्षण विकास मंडळ संचालित न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाला स्वच्छ विद्यालयमध्ये ‘पाणी’ या घटकासाठी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. ओरोस येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ अंतर्गत करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील सुमारे १६१० शाळांनी आपली पोर्टलवर नोंदणी केली होती. यापैकी जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी पाच तारका (५ स्टार) प्राप्त ९५ शाळांची पडताळणी झाली. मूल्यमापनकर्त्यांनी स्वच्छ विद्यालय पोर्टलवर ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ३८ शाळांची निवड केली. यामध्ये ‘पाणी’ या घटकासाठी येथील कनिष्ठ महाविद्यालयास जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला. ओरोस येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुरेश कुर्लीकर यांनी स्विकारले. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73571 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..