राजापूर-विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार साळवींचा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार साळवींचा अर्ज
राजापूर-विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार साळवींचा अर्ज

राजापूर-विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार साळवींचा अर्ज

sakal_logo
By

........
-rat2p20.jpg-
L33244
मुंबई ः महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज सादर करताना आमदार राजन साळवी.
----------
विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार साळवींचा अर्ज

राजापूरला प्रथमच संधी; तालिकाध्यक्षपदी काम केल्याचा अनुभव
राजापूर, ता. २ ः विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजापूरचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची राजापूरसाठी ही पहिली वेळ आहे. यापूर्वी तालिकाध्यक्ष म्हणून आमदार राजन साळवी यांनी काम केले आहे.
राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद भूषविणारे (कै.) ल. र. हातणकर हे राजापूर मतदारसंघातील पहिले आमदार आहेत. मात्र, विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून आजवर तशी कुणालाच संधी मिळाली नव्हती. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर विरोधी बाकावर बसणाऱ्या महाविकास आघाडीकडून आमदार साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. आमदार साळवी यांची सेनेच्या उपनेतेपदीही निवड झाली आहे. यापूर्वी महायुतीचे फडणवीस सरकार असो किंवा महाविकास आघाडीचे सरकार असो अधिवेशन काळात तालिकाध्यक्ष म्हणून साळवी यांनी काम केले आहे.
----

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73581 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top