२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२

sakal_logo
By

rat३०p८.jpg
L32714
मंगेश हटकर
.....
मंगेश हटकर ठरले जिल्ह्यातील
पहिले कब लिडर ट्रेनर

लांजा, ता. २ ः तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रुणचे पदवीधर शिक्षक मंगेश हटकर यांनी भारत स्काऊट आणि गाईडचे ए. एल. टी.( असिस्टंट लीडर ट्रेनर) चे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला कब लिडर ट्रेनर सन्मान प्राप्त केला आहे. त्यांचे ए. एल. टी. प्रशिक्षण भारत स्काऊट आणि गाईडचे भारतातील मुख्य प्रशिक्षण केंद्र पंचमढी (मध्यप्रदेश) येथे मे महिन्यात पार पडले होते. प्रशिक्षणानंतरचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये हटकर यांनी उज्ज्वल सुयश संपादन केले आहे.
स्काऊट आणि गाईड या जागतिक चळवळीत दहा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कब विभाग असतो. या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी भारत स्काऊट आणि गाईड विभागात प्रशिक्षणाचे विविध टप्पे असतात. त्यातीलच ए. एल. टी. प्रशिक्षण एक आहे. विशेष म्हणजे हटकर हे ए. एल. टी. प्रशिक्षण पूर्ण करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव पहिले प्राथमिक शिक्षक आहेत. हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना शंकर यादव, उद्धव शिंदे, वसंत माने यांनी प्रोत्साहन दिले. या यशाबद्दल हटकर यांचे राज्य प्रशिक्षण आयुक्त (गाईड विभाग) किशोरी शिरकर, राज्य प्रशिक्षण आयुक्त ( स्काऊट विभाग) गिरीश कांबळे, जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, जिल्हा संघटक अंजली माहुरे, गटशिक्षणाधिकारी विजयकुमार बंडगर, विस्तार अधिकारी विनोद सावंग, केंद्रीयप्रमुख दिलीप दिवाळे, विविध शिक्षक संघटना पदाधिकारी, भारत स्काऊट आणि गाईड राज्य, जिल्हा संस्था पदाधिकारी, शिक्षक यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73583 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top