खेड-खेडमधील जगबुडीचे पाणी ओसरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-खेडमधील जगबुडीचे पाणी ओसरले
खेड-खेडमधील जगबुडीचे पाणी ओसरले

खेड-खेडमधील जगबुडीचे पाणी ओसरले

sakal_logo
By

-rat२p२२.jpg
L३३२४६
- खेड ः मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात लावणीला सुरवात झाली आहे.
..
-rat२p२३.jpg
३३२४७
- जोरदार पावसामुळे ‘जगबुडी’च्या पाणी पातळीत वाढ झाली होती. (सिद्धेश परशेट्ये : सकाळ छायाचित्रसेवा)
------------
‘जगबुडी’चे पाणी ओसरले; भीती पळाली

खेडमध्ये नागरिकांसह व्यापाऱ्यांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २ : तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारिंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. १) रात्री जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहू लागल्याने खेड पालिकेने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र, शनिवारी (ता. २) पावसाचा जोर ओसरल्याने जगबुडी नदीचे पाणी ओसरले. त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पावसाचा जोर वाढल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी शेतीच्या कामाला जाताना वाटेत येणारे वहाळ, नाले पार करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या पावसाने यावर्षी शेतकऱ्यांना वाट बघायला लावली. २५ जून उजाडला तरी कोकणात पावसाचा जोर नसल्याने पेरणीनंतर शेतात झालेल्या रुजवा करपण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, गेली चार दिवस जोरदार पाऊस कोसळू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी लावणीच्या कामाला सुरवात केली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतकऱ्यांना लावणी उरकणे सहज शक्य होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73590 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..