चिपळूण ः 4 धोकादायी ठिकाणी फ्लड लाईट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः 4 धोकादायी ठिकाणी फ्लड लाईट
चिपळूण ः 4 धोकादायी ठिकाणी फ्लड लाईट

चिपळूण ः 4 धोकादायी ठिकाणी फ्लड लाईट

sakal_logo
By

टु १
....
परशुराम घाट ः लोगो
,....
फोटो काल सोडला
- ratchl२२.jpg
L३३२६४
चिपळूण ः परशुराम घाटात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
----------
चार धोकादायक स्थळी फ्लड लाईट लावा

प्रत्येक खात्याला सूचना; उपाययोजनांसाठी हालचाली
चिपळूण, ता. २ ः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात गेल्या सहा महिन्यांपासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. घाटात डोंगर कटाई केल्याने पावसाळ्यात तो धोकादायक बनला आहे. त्यामुळे दरडी कोसळून आपत्तीच्या घटना घडू नयेत, यासाठी घाटात उपाययोजनांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी नुकतीच सर्व विभागांची बैठक घेऊन सतर्कतेच्या सूचना दिल्या.
परशुराम घाटातील दरडीबाबत ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी पेढे ग्रामपंचायतीकडे येत आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी या घाटातील उपाययोजनांबाबत सर्व विभागांची बैठक घेतली. यावेळी परशुराम घाट आरंभ व शेवट या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने पोलिस, राष्ट्रीय महामार्ग, महसूल विभाग, आरोग्य विभाग नियंत्रण कक्ष, महामार्ग ठेकेदार, ॲम्ब्युलन्स यांचे सर्वांचे दूरध्वनी क्रमांक असलेला मोठा बोर्ड तयार करून तो तत्काळ लावण्यात यावा, अशा सूचना केल्या आहेत. परशुराम घाटात अद्याप लाईटची व्यवस्था केलेली नाही. लाईटची व्यवस्था तत्काळ करून घाटामध्ये धोकादायक निश्चित केलेली ३ ठिकाणे व आता नव्याने धोकादायक झालेले १ ठिकाण या ठिकाणी फ्लड लाईट तत्काळ लावावी, तसेच जो लाईट लावलेला आहे, तो चुकीच्या दिशेला लावलेला असल्याने त्याची दिशा तत्काळ बदलण्यात यावी, असेही सुनावले.
राष्ट्रीय महामार्गाचे महाड येथील कार्यालयातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची १५-१५ दिवस चिपळूण येथे २४ तास उपस्थिती असणे अत्यंत आवश्यक आहे, राष्ट्रीय महामार्गाचे दोन्ही ठेकेदार यांनी घाटामध्ये फ्लॅशर लावलेल्या गाड्या ठेवाव्यात, त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांच्या परवानगीसाठी वाहन क्रमांक व वाहन चालक परवाना उपविभागीय अधिकारी कार्यालय चिपळूण (महसूल) यांच्याकडे सुपूर्द करावा. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत परवानगीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयास पत्र दिले जाईल. राष्ट्रीय महामार्गाने त्यांच्या कर्मचाऱ्यांची २४ तास घाटामध्ये नियुक्ती करून ज्यावेळी सकाळी व संध्याकाळी ड्युटीत बदल होईल, त्यावेळी तालुका नियंत्रण कक्षात फोन करून नावे व मोबाईल क्रमांक द्यावेत.
------------------------------------
चौकट
यंत्रणा घटनास्थळी तत्काळ पोचावी....
राष्ट्रीय महामार्गाने एक स्वतंत्र गाडीची व्यवस्था करून त्यामध्ये दोरखंड, वॉकी-टॉकी, शिडी, बॅरिकेड्‍स, बॅटरी यांची उपलब्धता ठेवावी. परशुराम घाटामध्ये ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वाहून आलेली माती व दगड, तसेच इतर कचरा साचून ड्रेनेज बंद होऊन प्रवाहात बदल होऊ नये. यासाठी दिवसातून महामार्गाच्या गस्तीसाठी नेमलेल्या पथकाने ड्रेनेज साफ करावे. दोन्ही ठेकेदार व महामार्ग विभाग यांनी घाटामध्ये जेसीबी, पोकलेन, डंपर, ग्रेडर, गॅस कटर अशी यंत्र सामुग्री उपलब्ध ठेवावी. तसेच ही यंत्रणा घटनास्थळी तत्काळ पोहचेल, अशा ठिकाणी ठेवून द्यावी. तसेच या परिसरातील निवारा केंद्र देखील सज्ज ठेवण्याची सूचना पवार यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73610 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..