चिपळूण ः परशुराम घाटात रात्री प्रवास बंद ठेवावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः परशुराम घाटात रात्री प्रवास बंद ठेवावा
चिपळूण ः परशुराम घाटात रात्री प्रवास बंद ठेवावा

चिपळूण ः परशुराम घाटात रात्री प्रवास बंद ठेवावा

sakal_logo
By

परशुराम घाटात रात्रीचा प्रवास बंद ठेवावा

स्थानिकांची मागणी; अफवांचे पिक ही डोकेदुखी
चिपळूण, ता. २ ः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून प्रवास करताना अनेकांच्या पोटात गोळा येत आहे. या घाटात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग विभागासह पोलिस, महसूल विभाग, आरोग्य विभाग व ठेकेदार कंपनीचे नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून रात्रीच्यावेळी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असते. त्यामुळे घाटातून किमान पावसाळा कालावधीत रात्रीच्या वेळी प्रवास बंद ठेवायला हवा, अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.
परशुराम घाटात चौपदरीकरणासाठी जागोजागी उत्खनन केले असल्याने घाटातील प्रवास धोकादायक बनला आहे. अनेक ठिकाणी घाटात रस्त्यावर डोंगर कटाईची माती आली आहे. त्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. पावसामुळे वाहतूकदारांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. त्यातच आता पावसाचा जोर वाढल्याने चिंता वाढली आहे. या पावसामुळे आता घाटमाथ्यावर उत्खनन झालेल्या ठिकाणी जागोजागी पाण्याचे झरे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दरड कोसळण्याचा धोकाही संभवत आहे. या भीतीमुळे स्थानिकही हैराण झाले आहेत.
...
चौकट
भीतीचे वातावरण
अनेक नागरिक रात्री, अपरात्री स्थानिकांना फोन करून घाटातील परिस्थितीबाबत सतत चौकशी करत असतात. त्यातच अफवांना पीक येत असल्याने प्रशासनाबरोबरच स्थानिक ग्रामस्थांसाठी देखील परशुराम घाट डोकेदुखी बनला आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत रात्रपाळीसाठी जाणाऱ्या कामगारांमध्येही भीतीचे वातावरण कायम आहे. या परिस्थितीमुळे रात्री ९ ते पहाटे ५ यावेळेत परशुराम घाट काही दिवस बंद ठेवण्याची मागणी जोर धरू पहात आहे. या मागणीला पेढे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. लवकरच निवेदन दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
.............
कोट
सध्या पावसाचा जोर वाढला असल्याने भीतीपोटी अनेकजण फोन करीत असतात. बऱ्याचदा नाल्यातून पाण्यासोबत दगडी वाहून आल्यानंतर मोठमोठ्याने आवाज येतो. त्यामुळे काही घडले तर नाही ना, अशी भीती वाढली आहे. तसेच इतर भागातूनही नागरिक विशेषतः रात्रीच्या वेळी संपर्क करतात. काही वेळा अफवा पसरल्याचेही लक्षात येते. तेव्हा आता पावसाचा जोर सुरु असताना हा घाट बंद ठेवणे सोयीचे होईल.
-प्रवीण पाकळे, सरपंच, पेढे ता. चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73611 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..