पान एक-सिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी नऊ रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-सिंधुदुर्गात कोरोनाचे 
आणखी नऊ रुग्ण
पान एक-सिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी नऊ रुग्ण

पान एक-सिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी नऊ रुग्ण

sakal_logo
By

सिंधुदुर्गात कोरोनाचे
आणखी नऊ रुग्ण
---
६९ सक्रिय; १५ जण आजारमुक्त
ओरोस, ता. २ ः जिल्ह्यात आज कोरोनाचे नऊ नवीन रुग्ण मिळाले; तर दिवसभरात १५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्ण ६९ आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७ हजार ६२१ कोरोना रुग्ण मिळाले. यातील ५६ हजार १९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एक हजार ५३३ रुग्णांचे निधन झाले. ६९ रुग्ण उपचार घेत आहेत. हे सर्व रुग्ण होम आयसोलेटेड आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज मिळालेले रुग्ण (कंसात एकूण रुग्ण)ः देवगड ० (६९७६), दोडामार्ग ३ (३२६४), कणकवली ० (१०,६३७), कुडाळ १ (११,९१०), मालवण १ (८२७०), सावंतवाडी २ (८५४२), वैभववाडी १ (२५६६), वेंगुर्ले १ (५१३४), जिल्ह्याबाहेरील ० (३२२). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण (कंसात मृत्यूचा आकडा)ः देवगड ७ (१८५), दोडामार्ग ७ (४७), कणकवली ७ (३२१), कुडाळ १५ (२५४), मालवण ४ (३०१), सावंतवाडी १३ (२१७), वैभववाडी १ (८३), वेंगुर्ले १५ (११६), जिल्ह्याबाहेरील रुग्ण ० (९).
यातील एकही रुग्ण गंभीर आजारी नाही. आरटीपीसीआर टेस्टमध्ये तीन लाख ४२ हजार ३०३ नमुने तपासण्यात आले. यातील ४१ हजार ३५४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने ११ नमुने घेण्यात आले. अँटिजेन टेस्टमध्ये एकूण दोन लाख ९८ हजार ७४२ नमुने तपासले. पैकी १६ हजार ४६४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन ७७ नमुने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण सहा लाख ४१ हजार ४५ नमुने तपासण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73634 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..